Ekta Kapoor: एकता कपूर अन् आई शोभानं दिला Alt Balaji च्या प्रमुखपदाचा राजीनामा..आता 'ही' व्यक्ती असणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ekta Kapoor

Ekta Kapoor: एकता कपूर अन् आई शोभानं दिला Alt Balaji च्या प्रमुखपदाचा राजीनामा..आता 'ही' व्यक्ती असणार...

टिव्हि क्षेत्रातील क्विन म्हटल्या जाणाऱ्या एकता कपूरने नुकतचं तिच्या चाहत्यांसोबत एक धक्कादायक बातमी शेअर केली आहे. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांनी 2017 मध्ये लाँच केलेल्या त्यांच्या OTT प्लॅटफॉर्म Alt Balaji चं प्रमुखपद सोडलं आहे. त्याची जबाबदारी आता नव्या टीमकडे सोपवण्यात आली आहे. एकताने स्वत: पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

एकताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे लिहिले आहे की, आज अधिकृतपणे एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी Alt Balaji कंपनीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची राजीनामा देण्याची प्रक्रिया गेल्या वर्षीच सुरू झाली होती. ALTBalaji कडे आता नवीन टीम आहे. तिच्या इतर प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकताने हा निर्णय घेतला आहे

आता विवेक कोका या OTT प्लॅटफॉर्मचे नवे चीफ बिजनेस ऑफिसर असतील, असेही तिने पोस्टमध्ये सांगितले आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'विवेक कोका हे Alt बालाजीचे नवीन चीफ बिजनेस ऑफिसर असल्याची घोषणा करताना कंपनीला आनंद होत आहे.

Alt Balaji ऑनलाइन प्लॅटफॉर्म त्याच्या अनोख्या कटेंटसाठी ओळखला जातो. जेव्हा Alt Balaji लाँच करण्यात आले तेव्हा त्यावर बॅक टू बॅक बोल्ड वेब सिरीज रिलीज झाल्या. त्यानंतर गेल्या वर्षी कंगना राणौतचा लोकप्रिय वादग्रस्त शो लॉकअप देखील Alt Balaji वर प्रसारित झाला होता. Alt Balajiत गेल्या दोन-तीन वर्षांत बरेच चढउतार आले होते.