Urfi Javed tweet: 'मी नास्तिक..',लखनौच्या नामांतरावर उर्फी अन् ट्रोलर्समध्ये राडा...प्रकरण नेमकं काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed News

Urfi Javed tweet: 'मी नास्तिक..',लखनौच्या नामांतरावर उर्फी अन् ट्रोलर्समध्ये राडा...प्रकरण नेमकं काय?

Urfi Javed News: आपल्या अतरंगी कपड्यांमुळे आणि तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फीने कोणत्याही मुद्द्यावर तिचं मत देण्यास मागे हटत नाही.

आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे नाव बदलण्याच्या चर्चेवर उर्फीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच धर्माबाबतही वक्तव्य केलं त्यामुळं ती आता चर्चेत आली आहे.

अलीकडेच, उर्फीने ट्विटरवर लखनौच्या नामांतरावर प्रतिक्रिया दिली आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनौच्या नामांतराच्या विधानाचा संदर्भ देत उर्फीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'याचा फायदा कुणीतरी सांगा, मला हिंदू-मुस्लिम राष्ट्रात नव्हे तर लोकशाही राष्ट्रात राहायचे आहे.'

त्यांनतर तिने पुन्हा ट्विटमध्ये म्हटले आहे की ती इस्लाम किंवा कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. उर्फीने लिहिले की, “हिंदूंनी माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी इस्लाम किंवा इतर कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. लोकांनी त्यांच्या धर्मामुळे एकमेकांशी भांडावे अशी माझी इच्छा नाही.

उर्फी जावेदच्या या वक्तव्यानंतर अनेक लोकांनी तिला ट्रोल करायला सुरवात केली. उर्फीला तिचं नाव बदलण्याचा सल्लाही नेटकऱ्यांनी दिला. परंतु काही लोक तिच्या विधानाचे समर्थन देखील केलं आहेत.

उर्फीला तिला ट्रोल करणाऱ्यांना कशाप्रकारे उत्तर द्याव हे चांगल्याप्रकारे माहित आहे. जेव्हा एकाने उर्फीला तिचे नाव बदलण्यास सांगितले तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “मी नास्तिक आहे. तू तिथे निघ ही माझी भूमिका आहे."

मोहम्मदची खिल्ली उडवल्याबद्दल एकाने तिला ट्रोल केले तेव्हा ती म्हणाली, "मी इस्लामचे पालन करत नाही, मग मोहम्मदबद्दल हा विनोद का आहे?" आता तू जोक करतोय." गंभीर विषयांवर उर्फी अनेकदा तिची तीव्र प्रतिक्रिया देताना दिसते.