esakal | भयपटांचा बादशाह हरपला; कुमार रामसे यांचं निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Kumar Ramsay

भयपटांचा बादशाह हरपला; कुमार रामसे यांचं निधन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

७०-८० च्या दशकात हॉरर चित्रपटांचे बादशाह मानल्या जाणाऱ्या रामसे बंधुंपैकी Ramsay Brothers कुमार रामसे Kumar Ramsay यांचे निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कार्डिअॅक अरेस्टने हिरानंदानी इथल्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. 'पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टने त्यांचे निधन झाले. झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला', अशी माहिती मुलगा गोपाल यांनी दिली. कुमार हे एफयू रामसे यांचे पुत्र आणि सात बंधूंपैकी सर्वांत मोठे होते. केशू, तुलसी, करण, श्याम, गंगू, अर्जुन ही त्यांच्या इतर बंधूंची नावं आहे. २०१९ मध्ये श्याम रामसे यांचं निधन झालं होतं. हे सर्व बंधू 'रामसे ब्रदर्स' म्हणून ओळखले जात. (Eldest of Ramsay Brothers Kumar Ramsay succumbs to cardiac arrest)

'रामसे ब्रदर्स'चे हॉरर चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात आहेत. 'पुराना मंदिर', 'साया', 'खोज' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. 'और कौन' आणि 'दहशत' या चित्रपटांची निर्मिती कुमार रामसे यांनी केली होती. कुमार यांच्या पश्ताच पत्नी शीला आणि राज, गोपाल व सुनील ही तीन मुलं आहेत.

हेही वाचा: 'थोडीतरी माणूसकी जपूया'; दिलीप कुमार यांच्या अंत्यविधीनंतर क्रितीची विनंती

फाळणीनंतर रामसे कुटुंब मुंबईत राहायला आलं होतं. इथे आल्यानंतर रामसे बंधूंच्या वडिलांनी इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान चालू केलं. त्यानंतर हळूहळू ते चित्रपटसृष्टीकडे वळाले. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सातही रामसे बंधूंनी चित्रपटसृष्टीत काम सुरू केलं. तुलसी आणि श्याम यांनी सुरुवातीला हॉरर चित्रपटांवर काम केलं. या दोघांनी मिळून हॉरर चित्रपटांचा एक ट्रेंडच सुरू केला होता. बॉलिवूडमधील भयपटांचे 'रामसे बंधू' बादशाह ठरले. रोमँटिक चित्रपटांचा काळ सुरू असताना रामसे बंधूंच्या हॉरर चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.

loading image