esakal | 'थोडीतरी माणूसकी जपूया'; दिलीप कुमार यांच्या अंत्यविधीनंतर क्रितीची विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

kriti

'थोडीतरी माणूसकी जपूया'; दिलीप कुमार यांच्या अंत्यविधीनंतर क्रितीची विनंती

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांच्या अंत्यविधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांना आणि पापाराझींना अभिनेत्री क्रिती सनॉनने Kriti Sanon विनंती केली आहे. याविषयी तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. 'अंत्यविधीसारख्या अत्यंत संवेदनशील घटनेच्या वेळी व्हिडीओ शूट करताना बॅकग्राऊंडमध्ये फोटोग्राफर्सच्या गप्पा ऐकायला मिळणं खूप त्रासदायक आहे', असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. दिलीप कुमार यांनी बुधवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर करण्यात आले. (Kriti Sanon urges paparazzi to not cover funerals after Dilip Kumars death)

क्रितीची विनंती-

"एखाद्या व्यक्तीची अंत्यविधी माध्यमांनी आणि पापाराझींनी कव्हर करणे गरजेचे आहे का? अंत्यविधी हा अत्यंत खासगी असतो आणि माध्यमांनी कॅमेरा फ्लॅशिंग न करता लोकांना शांतपणे शोक व्यक्त करू द्यावा. अशा संवेदनशील घटनाप्रसंगीचे व्हिडीओ पाहताना बॅकग्राऊंडमध्ये फोटोग्राफर्सना गप्पा मारताना ऐकायला मिळणं खरंच खूप त्रासदायक आहे. मी माध्यमांना आणि पापाराझींना विनंती करते की त्यांनी अंत्यविधीचं कव्हरेज करू नये. तुमची जवळची व्यक्ती हे जग सोडून गेल्यानंतर तुम्हाला असे कॅमेरा फ्लॅश झालेले आवडणार का? गोष्टी थोड्या बदलून पाहुयात.. कामाच्या आधी माणुसकीचा विचार करुयात", अशी पोस्ट क्रितीने लिहिली.

हेही वाचा: सिनेसृष्टीतील 'कोहीनूर' निखळला; दिलीप कुमार यांच्यासोबत सेलिब्रिटींच्या आठवणी

२०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यविधीच्या वेळीही क्रितीने माध्यमांवर संताप व्यक्त केला होता. शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्यांच्या प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे का, असा सवाल तिने उपस्थित केला होता.

loading image