अभिनेता सोनू सूदला निवडणूक आयोगाने जाहीर केलं 'पंजाबचा आयकॉन'

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 17 November 2020

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या सोनू सूदला संपूर्ण देश ओळखू लागला होता जेव्हा त्याने कोविड-१९च्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली.

मुंबई- अभिनेता सोनू सूदला निवडणूक आयोगाने पंजाबचा राज्य आयकॉन म्हणून घोषित केलं आहे. याबाबतची माहिती सोमवारी चंदीगढमध्ये जाहीर केलेल्या एका अधिकृत प्रतिक्रियेत देण्यात आली. ही प्रतिक्रिया पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी एस करुणा राजू यांच्यातर्फे सांगण्यात आली. त्यांच्या कार्यालयाने भारतीय निवडणूक आयोगाला यासंबंधी एक प्रस्ताव पाठवला होता जो मंजूर करण्यात आला.

हे ही वाचा: परदेशात अक्षय कुमारच्या लक्ष्मीचा बोलबाला, कमाईचा केला रेकॉर्ड  

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या सोनू सूदला संपूर्ण देश ओळखू लागला होता जेव्हा त्याने कोविड-१९च्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली. सोनू सूदने प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी परिवहन सेवा उपलब्ध करुन दिली. त्याच्या या माणुसकीचं सर्व स्तरांतून खूप कौतुक करण्यात आलं. 

कोरोना काळात प्रवाश्यांना त्यांच्या घरी पाठवण्यासोबतंच सोनू सदने वाराणसीच्या नाविकांना आणि गरजुंना मदत केली होती. आता या बॉलीवूड अभिनेत्याने देवरिया येथील एका गरीब विद्यार्थाचं स्वप्न करण्याचा विडा हाती घेतला आहे. देवरिया मधील या विद्यार्थ्याला कम्प्युटर इंजिनिअर बनून आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मात्र त्याची गरिबी त्याच्या शिक्षणामध्ये येत होती.

आता सोनू सूदने त्याच्या इंजीनिअरिंगच्या अभ्यासाचा पूर्ण खर्च स्वतःला करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याने सूर्य प्रकाशला सांगितलं की ''आईला सांग की तिचा मुलगा आता इंजिनिअर बनणार आहे.''  त्यामुळे गरजुंना अजुनही मदत करत त्याने अनेकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे.   

election commission made actor sonu sood the state icon of punjab  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election commission made actor sonu sood the state icon of punjab