Elon Musk: 'ठुकरा के मेरा प्यार…'; ट्विटर विकत घेताच इलॉन मस्कच्या 'एक्स गर्लफ्रेंड'चं अकाउंट डिलीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elon musk took over twitter ex girlfriend amber heard account deleted on twitter news

Elon Musk: 'ठुकरा के मेरा प्यार…'; ट्विटर विकत घेताच इलॉन मस्कच्या 'एक्स गर्लफ्रेंड'चं अकाउंट डिलीट

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून, हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. मस्क ट्विटरच्या सीईओ बनल्यानंतर हॉलिवूड सेलिब्रिटी एम्बर हर्डने तिचे ट्विटर अकाउंट डिलीट केले आहे. एम्बर हर्डने तिचा माजी पती जॉनी डेप विरुद्ध खटला हरल्यानंतर देखील ती चर्चेत आली होती. यामुळे तिला जॉनी डेपला करोडो रुपये द्यावे लागले होते. आता एम्बर हर्डची ट्विटर अकाऊंट डिलीट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे कारण ती इलॉन मस्कसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

एम्बर हर्डचे ट्विटर सोडल्यानंतर अनेकांनी सोशल मिडीयावर याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 'दॅट अंब्रेला गाय' या ट्विटर युजरने एक फोटो शेअर केला असून त्यात एम्बर हर्डने तिचे अकाउंट डिलीट केले आहे. हे समजल्यानंतर लोक खूप मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने लिहिले की, ती स्वतःची काळजी घेत आहे याचा खूप आनंद झाला. तिचे ट्विटर हँडल डिलीट केले जाण्याची शक्यता याआधीच अनेकांनी व्यक्त केली होती. एम्बर हर्डने ट्विटर का सोडले हे अद्याप कळू शकलेले नाही. त्यांच्याकडूनही याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

हेही वाचा: Congress: 'बहिण-भावाचं पटत नाहीये, म्हणून दीड महिना होऊनही…''; राहुल-प्रियंकाबाबत भाजप नेत्याचा दावा

जॉनी डेपसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर 2010 मध्ये 'द रम डायरीज'च्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. दोघांनी 2015 मध्ये लग्न केले, मात्र वर्षभरानंतर ते वेगळे झाले. अखेर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. एम्बर हर्ड आणि जॉनी डेपचे नाते संपल्यानंतर एम्बरचे नाव इलॉन मस्कशी जोडले गेले.

हेही वाचा: Isudan Gadhvi: मोदींच्या होमग्राउंडवर कोण आहेत 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; जाणून घ्या

दोघेही एकमेकांना डेट करत होते. 2016 मध्ये पहिल्यांदाच त्यांच्याबद्दलच्या बातम्या समोर आल्या. असे म्हटले जाते की, दोघांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले नाही. एम्बर आणि इलॉन एक वर्ष एकमेकांना डेट करत होते आणि 2017 मध्ये वेगळे झाले होते. 2018 मध्ये दोघे पुन्हा एकत्र असल्याच्या बातम्या आल्या पण हे प्रकरण काही महिनेच चाललं.

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अलविदा करणारा एम्बर हर्ड एकमेव नाही, केन ऑलिन, टोनी ब्रॅक्सटन यांसारख्या हॉलिवूड सेलिब्रिटींनीही ट्विटर सोडले आहे.

टॅग्स :TwitterElon Musk