Elvish Yadav Case: एल्विश यादव हाजिर हो! नोएडा पोलिसांनी केली 3 तास चौकशी; अडचणी वाढणार?

Noida Police Files FIR Against Elvish Yadav For Organising Rave Parties With Snake Venom, 5 Arrested
Noida Police Files FIR Against Elvish Yadav For Organising Rave Parties With Snake Venom, 5 ArrestedEsakal

Elvish Yadav Case: यूट्यूबर अन् बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत बरिच वाढ झाली तर दुसरीकडे त्याला ट्रोलही करणाऱ्यांची संख्याही वाढली. मात्र आता एल्विश हा सापांची तस्करी आणि विष पुरवल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे.

Noida Police Files FIR Against Elvish Yadav For Organising Rave Parties With Snake Venom, 5 Arrested
Bigg Boss 17 : सुशांतची आठवण येताच अंकिताच्या डोळ्यात पाणी, 'त्यानं नेहमीच....'! काय म्हणाली ती?

विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी एल्विशला समन्स पाठवले होते, त्यानंतर एल्विश काल रात्री नोएडा पोलिसांसमोर हजर झाला. यावेळी रेव्ह पार्टी प्रकरणात त्याची 3 तास चौकशी करण्यात आली.

Noida Police Files FIR Against Elvish Yadav For Organising Rave Parties With Snake Venom, 5 Arrested
Sushmita Sen Patched Up : सुष्मिताचं एक्स बॉयफ्रेंडसोबत झालं 'पॅचअप', दिवाळीत मिळणार गोड बातमी? व्हिडिओ व्हायरल

वृत्तानुसार, एल्विश मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यात हजर झाला आणि सुमारे दोन ते तीन तास त्याची चौकशी करण्यात आली. पहाटे 2 वाजल्यानंतर तो पोलिस स्टेशनमधून बाहेर आला.

Noida Police Files FIR Against Elvish Yadav For Organising Rave Parties With Snake Venom, 5 Arrested
Janhvi-Shikhar: दिवाळीला जान्हवीच्या बॉयफ्रेंडनं फोडला बॉम्ब! शिखरनं खुलेआम दिली प्रेमाची कबुली

तर पुन्हा रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विशची चौकशी होणार असल्याने त्याला पुन्हा बोलावण्यात येणार आहे. नोएडाचे डीसीपी हरीश चंदर यांनी याबाबत माहिती दिली.

नेमकं प्रकरण काय?

4 नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी सेक्टर 49 मध्ये छापा टाकून 9 जिवंत साप जप्त केले होते. या सापापैकी 5 कोब्रा साप आणि सांपाचे विषही सापडले होते.

यावेळी पोलिसांनी 5 जणांना अटकही केली. यातील अटक केलेल्या राहुलने चौकशीदरम्यान एल्विशचे नाव घेतेले आणि त्यानंतर एल्विशवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र एल्विशने या सर्व आरोपांचे खंडण करत, आरोप फेटाळले आणि पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com