Emergency Teaser: 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा...' काय आहे तो प्रसंग? | Indira Gandhi PM American president was called sir | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Emergency Teaser Viral

Emergency Teaser: 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा...' काय आहे तो प्रसंग?

Emergency Teaser: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीचं व्यक्तिमत्व हे वादळी होतं. देशाला एक महिला नेतृत्व त्यांच्या रुपानं मिळालं (Indira Gandhi) त्याच्या अनेक आठवणी आजही संस्मरणीय आहेत. सध्या बॉलीवूडची अभिनेत्री कंगणा रनौत इंदिराजींच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्या चित्रपटाचे नाव इमर्जन्सी असे आहे. आज (Bollywood Actress Kangana Ranaut) त्याचा टीझर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले आहे. विशेषत: कंगणानं साकारलेल्या इंदिरा गांधी, त्यांची बोलण्याची ढब, संवाद कौशल्य, हावभाव हे सारं प्रेक्षकांना कमालीचं भावलं आहे.

सोशल मीडियावर इमर्जन्सीच्या टीझर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगणा (Entertainment News) ही नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करुन चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. यापूर्वी तिनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले आहेत. त्यावर तिला ट्रोल केलं जाणं आणि तिच्यावर टीका होणं हे आता तिच्यासाठी नवीन राहिलेलं नाही. यासगळ्यांना कंगणानं सडेतोड उत्तर आपल्या चित्रपटांतून दिले आहे. कंगणाच्या इमर्जन्सीच्या टीझरनं प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. त्या टीझरमध्ये रोखठोक इंदिराजींच्या व्यक्तिमत्वातील एक वेगळा पैलु आपल्याला पाहायला मिळतो.

टीझरमध्ये इंदिराजींचा जो बाणेदारपणा दाखवण्यात आला आहे त्याचा एक खास किस्सा आहे. त्याचे झाले असे की, अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी इंदिरा गांधी यांना स्टेट व्हिजिटचे आमंत्रण दिले. इंदिराजी पंतप्रधान होऊन काही महिने सुद्धा झाले नव्हते. त्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा झाली. नुकताच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. 28 मार्च 1966 ला इंदिरा गांधी अमेरिकेला पोहचल्या. जेट लॅगमुळे व्हाइट हाऊसची भेट दुसऱ्या दिवशी नियोजित होती. जेष्ठ सनदी अधिकारी बी.के.नेहरू भारताचे अमेरिकेतील राजदूत होते. यावेळी एक फोन आला. बी के नेहरू यांनी तो रिसिव्ह केला. फोन व्हाइट हाऊस मधून आला होता. बी के नेहरूंनी इंदिरा गांधींना सांगितलं, “राष्ट्राध्यक्ष विचारत आहेत की आपल्याला प्राईम मिनिस्टर म्हणायचं की मॅडम प्राईम मिनिस्टर म्हणायचं?”

हेही वाचा: Kangana Video: 'तुम्हाला आता...' कंगनाची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इंदिराजींनी दिलेलं उत्तर तेव्हा फार चर्चेत आलं होतं. आताही ते इमर्जन्सीच्या टीझरच्या निमित्तानं पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. “राष्ट्राध्यक्षांनी काय म्हणावं याला आपली काही हरकत नाही, पण त्यांना एक गोष्ट सांगा माझे सहकारी मला सर म्हणून हाक मारतात.” इंदिराजींचं हे उत्तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची साक्ष पटवून देणारे होते. बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखल्या गेलेल्या कंगणानं आता इंदिराजींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. तिनं या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे.

हेही वाचा: Video: विद्याधर जोशी आणि अतुल काळे आमनेसामने

Web Title: Emergency Teaser Viral Kangana Ranaut Play Indira Gandhi Pm American President Was Called Sir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top