राडाच! सिरियल किसर इम्रान हाश्मी सोबत सई ताम्हणकर करणार रोमान्स.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Emraan Hashmi and Sai Tamhankar in Ground Zero movie

राडाच! सिरियल किसर इम्रान हाश्मी सोबत सई ताम्हणकर करणार रोमान्स..

sai tamhankar : सई ताम्हणकर हे नाव आता मराठी पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. नुकतच तिला 'मिमी' या हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा 'फिल्म फेअर' पुरस्कार मिळाला. सईने या आधीही बॉलीवुड मध्ये आपली जादू दाखवली आहे. आता पुन्हा एकदा ती बॉलीवुड मध्ये झळकणार आहे. पण यंदा ती बॉलीवुड मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि सिरियल किसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्रान हाश्मी सोबत झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये अधिकच उत्सुकता आहे.

सई लवकरच एका हिंदी चित्रपटात दिसणार असून एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सई आणि इम्रान हाश्मी यांची जोडी आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचं नाव ‘ग्राउंड झिरो’ असं असून चित्रपटाच्या शूटिंगला काश्मीरमध्ये सुरुवात झाली आहे.

इम्रान सोबत सई देखील प्रमुख भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी एका लष्कर अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई इम्रान हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट म्हणजे एक मिलिटरी ड्रामा असणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देवस्कर करत आहेत. सई आणि इम्रानच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेत्री झोया हुसैनदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सई आणि इम्रानचे रोमँटिक सिन देखील असणार आहेत. त्यामुळे हि नवी जोडी बॉलीवूड वर काय जादू करतेय, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Emraan Hashmi And Sai Tamhankar In Ground Zero Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..