शाहरुख खान नाही, तर इमरान हाश्मी असेल सलमान खानसोबत 'टायगर 3' मध्ये |Emraan Hasmi latest news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan-Emraan Hashmi

शाहरुख खान नाही, तर इमरान हाश्मी असेल सलमान खानसोबत 'टायगर 3' मध्ये

अभिनेता सलमान खान (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) साठी मोठ्या प्रमाणावर शूटिंग करत आहे. या आठवड्यात त्याच्यासोबत सेटवर अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) देखील सामील झाला आहे. पूर्वी अशी अफवा पसरली होती की शाहरुख खान (Shahrukh Khan) या कॅमिओसाठी शूट करेल, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार SRK फक्त फेब्रुवारीमध्ये टायगर 3 चे शूटिंग करणार आहे. दरम्यान, सलमान आणि इमरान एका अॅक्शन सीनसाठी पुन्हा एकत्र आले आहेत.

Shahrukh Khan-Salman Khan

Shahrukh Khan-Salman Khan

इमरान हाश्मी आणि सलमान खान एका आंतरराष्ट्रीय अॅक्शन डायरेक्टर्ससोबत SRPF मैदानावर काही अॅक्शन सीक्वेन्स शूट करणार आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी इमरानने ट्विटरवर त्याचा एक हॉट अंदाजातला फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो चित्रपटाच्या पुढील शेड्यूलमध्ये सलमान खानशी सामना करण्यास तयार असल्याचे दिसून आले. आतापर्यंत इम्रानने या बद्दल बोलणे टाळले होते. अभिनेता खरोखरच या चित्रपटात पाकिस्तानच्या टायगरची भूमिका करणार असल्याचे समजले आहे.

या अॅक्शन फ्रँचायझीमध्ये (Action Franchise) त्याचा टायगर ऑफ इंडियाशी जबरदस्त सामना होणार आहे. कतरिना कैफ देखील लवकरच 'टायगर 3' च्या सेटवर सामील होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मुलगी इराचा कहर, बॉयफ्रेंडचा तो फोटो शेयर केला, आमीरनं तर...

Salman Khan-Katrina Kaif

Salman Khan-Katrina Kaif

'टायगर 3' गुंडाळल्यानंतर सलमान खान त्याच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम सुरू करेल अशी अपेक्षा आहे. तो फेब्रुवारी २०२२ च्या अखेरीस एक नवीन चित्रपट सुरू करणार आहे. यावर्षी सलमानचे काही मनोरंजक उपक्रम आहेत; तो पूजा हेगडेसोबत (Pooja Hegde) 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) आणि जॅकलिन फर्नांडिससोबत (Jacqueline Fernandes) 'किक २' (Kick 2) मध्ये दिसणार आहे.

सलमान खानने शाहरुख खान स्टेरर 'पठाण' (Pathan) मध्ये एक मनोरंजक कॅमिओसाठी (Cameo) देखील शूट केले आहे आणि तो आमिर खानच्या (Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा' (Lal Singh Chadha) मध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण भूमिका करताना दिसणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top