मराठी चित्रपटसृष्टीत नाशिकचा नवा चेहरा

हर्षदा देशपांडे
मंगळवार, 27 जून 2017

‘वा..! पहिलवान’ लवकरच चित्रपटगृहांत 
नाशिक - संगीत, नाट्य व अभिनय अशा अनेक ठिकाणी नाशिकचे कलाकार आपला नावलौकिक वाढवत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी पल्लवी कदम हा नवा चेहरा मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘वा..! पहिलवान’ लवकरच चित्रपटगृहांत 
नाशिक - संगीत, नाट्य व अभिनय अशा अनेक ठिकाणी नाशिकचे कलाकार आपला नावलौकिक वाढवत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी पल्लवी कदम हा नवा चेहरा मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हिंदी, मराठी चित्रपटांत छोट्या भूमिका साकारणारी पल्लवी लीड रोलमध्ये ‘वा..! पहिलवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करणार आहे. मराठी मालिकांतून ‘माझिया माहेरा’, ‘लक्ष्य’, मराठी चित्रपट ‘फक्त सातवी पास’, ‘जरब’, ‘यूथ’, हिंदी सिनेमा ‘बुलेट राजा’, ‘खाकी’ अशा चित्रपटांतून पल्लवीने छोट्या भूमिका साकारल्या होत्या. ‘बुलेट राजा’तील तिची पत्रकाराची भूमिका लक्षात राहणारी ठरली. जिनिअस ग्रुपचे ‘रिमझिम रिमझिम’ हे नाटकही तिने केले आहे. पण ‘वा..! पहिलवान’च्या माध्यमातून राधा हे मुख्य पात्र तिला साकारण्याची संधी मिळाली आहे. ‘वा..! पहिलवान’ कुस्ती करणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावरील तरुणाची ही कथा आहे. या तरुणाचे लग्न राधेसोबत होते आणि त्याच्या कुस्ती व लग्नाच्या नात्यातील रंगलेला खेळ, हे ‘वा..! पहिलवान’ या चित्रपटातील कथेचे मुख्य सूत्र आहे. त्यामुळे राधेची भूमिका ही आव्हानात्मक होती. पुण्याच्या खेड, आंबेगाव येथे चित्रपटाचे शूटिंग झाले असून, ग्रामीण ढंगातील अभिनय करणे आणि तेथील जीवन जाणून घेण्यासाठी पल्लवीने मोठी मेहनत घेतली आहे. बहुरंग बॅनरखाली तयार होत असलेला हा चित्रपट पहिलवानाचे आयुष्य समाजासमोर मांडण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील देहबोलीपासून ते भाषा अशा अनेक गोष्टींवर मी काम केले. पेहराव आणि कथेला साजेसा अभिनय हे खरेच आव्हान होते. याआधी साकारलेल्या भूमिका छोट्या होत्या. त्यामुळे कधी दडपण आले नाही, पण लीड रोलसाठी काम करताना चॅलेंज वाटले. 
-पल्लवी कदम, अभिनेत्री

Web Title: entertainment news marathi movie new face in nashik