Esha Deol And Bharat Takhtani Divorce: ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा घटस्फोट; 11 वर्षांनंतर मोडला हेमा मालिनींच्या लेकीचा संसार

Esha Deol And Bharat Takhtani Divorce: ईशा देओल आणि भरत तख्तानी हे 11 वर्षाच्या संसारानंतर विभक्त झाले आहेत.
Esha Deol And Bharat Takhtani Divorce
Esha Deol And Bharat Takhtani Divorce

Esha Deol And Bharat Takhtani Divorce: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) आणि भरत तख्तानी (Bharat Takhtani) यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता ईशा आणि भरत या दोघांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी हे 11 वर्षाच्या संसारानंतर विभक्त झाले आहेत.

रिपोर्टनुसार, ईशा आणि भरत यांनी निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, "परस्पर संमतीने आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जीवनातील या बदलामध्ये, आमच्या मुलांसाठी काय योग्य आहे? हे महत्त्वाचे आहे."

ईशा देओल ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशाने 2002 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ईशा देओलनं काही वर्ष उद्योगपती भरत तख्तानीला डेट केलं. त्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या जवळपास 11 वर्षांनंतर ईशानं भरतला घटस्फोट दिला आहे. ईशा आणि भरत हे 6 वर्षांची मुलगी राध्या आणि चार वर्षांची मिराया यांचे पालक आहेत.

ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती कारण दोघेही कोणत्याही इव्हेंटमध्ये एकत्र दिसले नव्हते. आता ईशा आणि भरत यांनी त्यांच्या एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे.

कोण आहे आहे भरच तख्तानी?

भरत तख्तानी हा मुंबईतील एचआर कॉलेजमधून वाणिज्य आणि अर्थशास्त्र विषयात पदवीधर आहेत. ईशा आणि भरत हे वेगवेगळ्या शाळांमध्ये होते, पण ते एका आंतरशालेय स्पर्धेदरम्यान एकमेकांना भेटले. कॉलेज संपल्यानंतर भरतने वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचे काम केले. भरत तख्तानी हा आरजी बँगल प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे मालक आहे.

ईशाचे चित्रपट

ईशानं 2002 मध्ये रिलीज झालेल्या कोई मेरे दिल से पुछे या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ईशानं ना तुम जानोना हम,क्या दिल ने कहा, धूम, नो एन्ट्री यांसारख्या चित्रपटांमध्ये ईशानं काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com