Har Har Mahadev: 'धमक्यांना भीत नाही,माझा पुढचा चित्रपटही महाराजांवरच,पहाल तर..'- अभिजित देशपांडे Har Har Mahadev Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exclusive Interview with 'Har Har Mahadev  Director Abhijeet Deshpande'. speak about controversy and new project on Chatrapati Shivaji Maharaj,

Har Har Mahadev: 'धमक्यांना भीत नाही,माझा पुढचा चित्रपटही महाराजांवरच,पहाल तर..'- अभिजित देशपांडे

Har Har Mahadev Controversy:अभिजित देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' हा चित्रपट जोरदार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप 'हर हर महादेव' वर केला जात होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या चित्रपटा विरोधात काही संघटनांनी तसंच राजकीय पक्षांनी आंदोलनं केली. इतकंच काय तर थेट चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना देखील मारहाण केली.

या सगळ्या वादावर सडेतोड बोलत 'हर हर महादेव' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडेनी ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपल्या आगामी चित्रपटाविषयी मोठा खुलासा केला आहे.

सिनेमात काय दाखवणार आणि तो कसा असेल यावरही ते बोलले आहेत. मात्र त्यासाठी बातमीत जोडलेल्या पॉडकास्ट मुलाखतीच्या लिंकवर क्लीक करा आणि संपूर्ण मुलाखत ऐका. (Exclusive Interview with 'Har Har Mahadev Director Abhijeet Deshpande'. speak about controversy and new project on Chatrapati Shivaji Maharaj),

हेही वाचा: Samantha- नागाचैतन्यचा घटस्फोटानंतर १ वर्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार,चर्चेला उधाण...

आता या मारहाणीसाठी कारणीभूत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासाठी आव्हाडांना आता न्यायालयीन कोठडीही सुनावली आहे. या सर्व प्रकरणानंतर सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत 'हर हर महादेव' चे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी विरोधकांवर तोफ डागत आपण कुठल्याही धमक्यांना घाबरलेलो नसून पुढचा चित्रपटही महाराजांवरच काढणार असं जाहीर केल्यानं आता चाहत्यांची उत्सुकता वाढणार आणि विरोधक कान टवकारणार हे नक्की. तेव्हा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली मुलाखतीची पॉडकास्ट लिंक जोडली आहे,ती नक्की ऐका.

'हर हर महादेव'चे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत इथे ऐका.

अभिजित देशपांडे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, आपल्याला खरंतर चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच धमक्यांचे फोन येत होते. अजूनही ते सुरुच आहे. पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांना केलेली अटक..यावर बोलताना अभिजित यांनी 'हे होणारंच होतं..' असं एकाच वाक्यात कडक उत्तर दिलं. आपण आता सरकारकडे पत्र लिहित थिएटरमध्ये 'हर हर महादेव' पहायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी करणार असल्याचं देखील ते म्हणाले. डबक्यात राहणारी ही लोक असं विरोधकांना हिणवत अभिजित देशपांडे यांनी तोफ डागली आहे,त्यासाठी बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

आपल्या आगामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटावर बोलताना अभिजित देशपांडे यांनी काही खुलासे केले आहेत ते पॉडकास्ट मुलाखतीत आपण ऐकालच.