माधुरी-रवीनामध्ये रंगली चुरस; 'अंखियों से गोली मारे' गाण्यावर केला जबरदस्त डान्स

या दोघींना एकत्र डान्स करताना पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणीच असते.
raveena madhuri
raveena madhuri
Updated on

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रवीना टंडन या बॉलिवूडमधल्या एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. या दोघींना एकत्र डान्स करताना पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणीच असेल. 'डान्स दिवाने' या रिअॅलिटी शोच्या मंचावर या दोन अभिनेत्रींमध्ये चुरस रंगली होती. 'अंखियों से गोली मारे' या गाण्यावर या दोघी डान्स करताना पहायला मिळत आहेत. रवीना-माधुरीच्या जबरदस्त डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ९० च्या दशकात या दोन अभिनेत्रींनी बॉलिवूड गाजवलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा या दोघींना एकत्र पाहून चाहते खूश झाले आहेत.

१९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दुल्हे राजा' या चित्रपटातील 'अंखियों से गोली मारे' हे गाणं तुफान गाजलं. गोविंदा आणि रवीना टंडन या गाण्यावर थिरकले होते. त्यानंतर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पती पत्नी और वो' या चित्रपटात या गाण्याचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजही या गाण्याची जादू तसूभरही कमी झाली नाही.

raveena madhuri
'या' कारणामुळे सुरेश वाडकरांनी नाकारलं होतं माधुरी दीक्षितचं स्थळ

माधुरी दीक्षित सध्या 'डान्स दिवाने'च्या तिसऱ्या सिझनमध्ये परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून रवीनाने हजेरी लावली होती. त्यावेळी या दोघी मंचावर एकत्र थिरकल्या. या दोघींच्या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com