Bigg Boss 16: वाइल्ड कार्ड एंट्री घेणारा फहमन खान कोण आहे? ज्याला पाहून सुंबूल वेडी झाली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fahmaan Khan enters Bigg Boss 16 as wildcard and Sumbul Touqeer express her feelings

Bigg Boss 16: वाइल्ड कार्ड एंट्री घेणारा फहमन खान कोण आहे? ज्याला पाहून सुंबूल वेडी झाली..

bigg boss 16: बिग बॉस १६ हा बहुचर्चित शो सुरू होऊन सध्या 50 दिवसांचा टप्पा पूर्ण होत आला आहे आणि दिवसेंदिवस हा शो जास्त मनोरंजक होत आहे. आता बिग बॉस १६ मध्ये आला आहे नवीन ट्वीस्ट. सुंबूलचा खास मित्र फहमन खान 'बिग बॉस'मध्ये आला आहे. ज्याला पाहून सुंबूल अक्षरशः वेडी झाली..

(Fahmaan Khan enters Bigg Boss 16 as wildcard and Sumbul Touqeer express her feelings)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: मी नाय त्यातली, कडी लाव आतली.. तेजस्विनी-अपूर्वामध्ये खडाजंगी..

'बिग बॉस १६' मधील शालीन भानोत आणि सुंबूल तौकीर खानच्या नात्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहेच .पण सलमान खाननेही या दोघांच्या नात्याबद्दल बोलून दोघांना एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. आता सुंबूलचा मित्र फहमन खानने शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

प्रोमोमध्ये फहमन खान बिग बॉसच्या घरात पोहोचल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओ बिग बॉसच्या घोषणेने सुरू होतो आणि ते म्हणतात की, घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होत आहे आणि फहमन घरात प्रवेश करतो. तो घरात येताच सुंबुल पळत जाऊन त्याला मिठी मारते आणि भावूक होते.

यानंतर सुंबुल फहमनला सांगते की हे, स्वप्न आहे का की तू खरोखर आला आहेस, तू येणार नव्हतास ना? यावर फहमन म्हणतो, 'मला वाटले की तुला माझी गरज आहे.' फहमन आल्याने सुंबुलला खूप आनंद झाला. पुढे ती म्हणते.. आता तू आलास.. मला दुसरे काही नको.

हेही वाचा: Salim Khan Birthday: पत्नी, चार मुलं, घरातून विरोध असतानाही हेलनच्या प्रेमात वेडे होते सलीम खान..

सुंबुल आणि फहमन यांनी स्टार प्लस शो 'इमली' मध्ये एकत्र काम केले होते. दोघांची बाँडिंग खूप चांगली आहे आणि त्यांच्या डेटींगच्या बातम्याही येत होत्या. ते रिलेशन मध्ये होते असेही आता बोलले जात आहे. तर काहींच्या मते ही वाइल्ड कार्ड एन्ट्री नसून फहमन केवळ सुंबूलला सपोर्ट करण्यासाठी तो शोमध्ये आला आहे आणि फक्त एक दिवस घरात राहणार आहे. अशा परिस्थितीत आता फहमन गेल्यानंतर सुंबूल आपल्या खेळात सुधारणा करू शकते का हे पाहावे लागेल.

टॅग्स :Big Bossbigg boss