esakal | 'द फॅमिली मॅन 2' पाहायचायं; मग ही बातमी तुमच्यासाठीच 

बोलून बातमी शोधा

the family man 2 is expected to release in may manoj bajpayee looks special an

द फॅमिली मॅनच्या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुस-या भागाला जोरदार प्रतिसाद मिळणार असल्याचा मनोज वाजपेयीचा अंदाज बरोबर होता.

'द फॅमिली मॅन 2' पाहायचायं; मग ही बातमी तुमच्यासाठीच 
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीच्या ज्या वेबसीरिज आहेत त्यात द फॅमिली मॅननं सर्वांची पसंती मिळवली होती. ही मालिका सर्वांच्या आवडीची होती. त्या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती दुस-या भागाची. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून फॅमिली मॅनचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यानच्या काळात तांडव ही मालिका प्रदर्शित झाली होती. त्या मालिकेवरुन झालेल्या वादाचा फटका द फॅमिली मॅनला बसल्याची चर्चा आहे. मालिकेतील प्रमुख कलाकार मनोज वाजपेयी यानं सोशल मीडियावरुन ही मालिका दोन महिन्यांपूर्वीच प्रदर्शित होणार असल्य़ाचे सांगितले होते. मात्र तसे काही झाले नाही. आता ही मालिका प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

द फॅमिली मॅनच्या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुस-या भागाला जोरदार प्रतिसाद मिळणार असल्याचा मनोज वाजपेयीचा अंदाज बरोबर होता. मात्र या मालिकेचा दुसरा भाग कधी प्रदर्शित करावा याविषयी अद्याप काही ठरत नसल्याचे दिसून आले आहे. येत्या मे महिन्यात हा मालिका प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे द फॅमिली मॅनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. गेल्या अनेक काळापासून चाहते मालिकेच्या दुस-या भागाची वाट पाहत आहेत.

मे महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी ही मालिका प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये या मालिकेचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. आतापर्यत दुस-या सीझन केव्हा प्रदर्शित होणार याविषयी अधिकृतरीत्या काही सांगण्यात आलेले नाही. कोरोनामुळे दुस-या सीझनला विलंब होत असल्याचीही चर्चा आहे. 

साजिदच्या पत्नीनं वाजिदला दिली होती किडनी; आईला रडू आले

बॉलीवूड नंतर भोजपूरीत घुसला कोरोना; अभिनेत्री आम्रपालीला झाली लागण 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये जेव्हा तांडव नावाची मालिका प्रदर्शित झाली होती त्यावेळी त्या मालिकेवरुन मोठा वाद झाला होता. तेव्हाच आपल्यालाही ही मालिका आताच प्रदर्शित करायची नाही असा निर्णय द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांनी घेतला होता. तांडवचा वाद झाला नसता तर ही मालिका फेब्रुवारीमध्येच प्रदर्शित झाली असती. त्यावेळी या मालिकेतील शेवटचा भाग शुट व्हायचा बाकी होता. आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात ही मालिका प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.