
या अगोदर द फॅमिली मॅन 2 चे एक पोस्टर प्रसिध्द करण्यात आले होते. त्यात 2021 आणि टाईम बॉम्ब असे सांगितले गेले.
मुंबई - बहुचर्चित अशा द फॅमिली मॅनच्या दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना मागील वर्षभरापासून होती. मात्र त्या अंतिम तारखेला काही मुहूर्त लागत नव्हता. कमालीची लोकप्रियता वाट्याला आलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांना वाट पाहायला लावली होती. आता ती केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख निर्मात्यांनी नक्की केलं आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यानं त्याच्या सोशल अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी ही मालिका कधी प्रदर्शित होणार हे सांगितले होते. मात्र त्यात तारखेचा कुठलाही उल्लेख नव्हता.
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ वरील सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे द फॅमिली मॅन. अल्पावधीतच या मालिकेनं सर्वांची पसंती मिळवली. त्याचा पहिला भाग संपल्यानंतर दुस-या भागाची घोषणा निर्मात्यांनी केली होती. नियोजनानुसार चित्रिकरणही पार पडले होते. मात्र अधिकृतरीत्या तारीख न सांगितल्यानं प्रेक्षकांना वाट पाहावी लागत होती. त्यात या मालिकेतील प्रमुख कलाकार मनोज वाजपेयी यानेही लवकरच तुमची आवडती मालिका घेऊन येतो आहे असे म्हणून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. आता निर्मात्यांनी एकदाची तारीख जाहीर करुन प्रेक्षकांना दिलासा दिला आहे.
या मालिकेचा 2 सीझन हा आता 12 फेब्रुवारी 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याबाबत अॅमेझॉनने एक प्रोमो शेयर केला आहे. त्यात केवळ मनोज वाजपेयी दिसत आहे. त्याच्यासोबत रिलीज डेटची घोषणा केली आहे. तसेच च्या प्रोमोला कॅप्शन दिला आहे. त्यात म्हटले आहे की, श्रीकांत त्याच्या पुढील मिशनसाठी तयार झाला आहे. त्यानं सगळी तयारी सुरु केली आहे. शत्रुशी दोन हात करण्यासाठी तो सज्ज आहे. आता त्याचा व्हिलननं पाठलाग सुरु केला आहे.
या अगोदर द फॅमिली मॅन 2 चे एक पोस्टर प्रसिध्द करण्यात आले होते. त्यात 2021 आणि टाईम बॉम्ब असे सांगितले गेले. यामुळे एक नवी कथा प्रेक्षकांसमोर उलगणार असल्यानं सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्या टाईम बॉम्बवर मनोज वाजपेयी आणि शारिब हाश्मी यांचे छायाचित्र होते. त्यावेळी या मालिकेचा 2 सीझन केव्हा प्रदर्शित होणार हे काही सांगण्यात आले नसल्यानं फायनल तारखेचे वेध प्रेक्षकांना लागले होते. आता ती त्यांना माहिती झाली आहे. फॅमिली मॅन 2 मध्ये मनोज वाजपेयी, सामंथा अक्किनेनी, प्रियामणि, शारिब हाश्मी, सीमा बिश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुझा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर यांची भूमिका आहे.