esakal | The Family Man 2 : 'आधी सीरिज पाहा..'; वादानंतर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

the family man season 2

The Family Man 2 : 'आधी सीरिज पाहा..'; वादानंतर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'द फॅमिली मॅन २' The Family Man 2 या वेब सीरिजला वाढता विरोध पाहता दिग्दर्शक राज निदिमोरू, कृष्णा डीके आणि मुख्य अभिनेता मनोज वाजपेयी Manoj Bajpayee यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या सीरिजवर तमिळनाडू आणि तमिळ समुदायाची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्याला विरोध होऊ लागला. येत्या ४ जून रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार असून त्यावर बंदी आणावी अशीही मागणी काही जणांकडून होत आहे. (Family Man creators Raj and DK respond to calls for ban in Tamil Nadu)

'द फॅमिली मॅन २' टीमचं स्पष्टीकरण-

'ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्सवरून सीरिजच्या कथानकाबाबत काही गोष्टी गृहित धरल्या गेल्या आहेत. आमच्या टीममधील बरेच कलाकार, क्रिएटिव्ह आणि लेखन टीममधील काही जण हे तमिळ आहेत. आम्हाला तमिळ लोक आणि तमिळ संस्कृतीच्या भावनांची जाण आहे. तमिळ लोकांबद्दल आम्हाला फक्त प्रेम आणि आदर आहे. या सीरिजसाठी आम्ही काही वर्षे मेहनत केली आहे आणि प्रेक्षकांसमोर सिझन १ प्रमाणेच संवेदनशील, संतुलित अशी कथा सादर करायची आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी प्रदर्शनानंतर आधी ही सीरिज पहावी. ही सीरिज पाहिल्यानंतर तुम्ही त्याचं कौतुक नक्की कराल', असं दिग्दर्शकांनी निवेदनात म्हटलंय.

हेही वाचा: 'द फॅमिली मॅन 2' चा नवा मजेदार प्रोमो व्हायरल....

केंद्र सरकारने या सीरिजच्या प्रदर्शनावर बंदी आणावी अशी काही संघटनांची मागणी आहे. तमिळनाडू सरकारने सोमवारी या संघटनांना आपला पाठिंबा दर्शविला. यासंबंधी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवण्यात आले आहे.