'द फॅमिली मॅन 2' चा नवा मजेदार प्रोमो व्हायरल....

अमेझॉन प्राईम व्हिडिओनं नुकताच 'द फॅमिली मॅन 2' (the family man season 2 ) चा नवा प्रोमो सादर केला आहे.
the family man season 2
the family man season 2Team esakal

मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत मालिका म्हणून द फॅमिली मॅन(the family man season 2 ) विषयी सांगता येईल. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा सुरु आहे. आतापर्यत तीन ते चारवेळा या वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. जुनच्या पहिल्या आठवड्यात ही मालिका प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाची भावना आहे. निर्मात्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी टीझर, ट्रेलर प्रदर्शित केले आहेत. सध्या या मालिकेचा प्रोमोही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याला सोशल मीडियावरुन जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (the family man season 2 team share funny promo video on social media)

अमेझॉन प्राईम व्हिडिओनं नुकताच 'द फॅमिली मॅन 2' (the family man season 2 ) चा नवा प्रोमो सादर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी उर्फ ​​श्रीकांत तिवारी डेस्क जॉबवर 'मिनिमम मॅन'च्या रूपात दिसत आहे, जो पहिल्या सीजनमधील त्याच्या लुकहून वेगळा आहे. आता प्रेक्षकांना 'द फॅमिली मॅन 2' च्या नव्या सीझनची मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली आहे. जेव्हापासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर याची सुरुवात झाली होती, तेव्हापासून 'द फॅमिली मॅन'चा आगामी भाग, प्रेक्षकांच्या जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांनी दुस-या भागाची वाट पाहिली आहे.

या मालिकेचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. अमेझॉन ओरिजिनल सीरीजसोबत दक्षिण सुपरस्टार समंथा अक्किनेनी हिंदीमध्ये पदार्पण करत आहे. यासोबतच अभिनेता मनोज बाजपेयी (manoj bajpei) , प्रियामणि (priyamani), शारिब हाशमी (sharib hashmi), सीमा बिस्वास(sima biswas), दर्शन कुमार (darshan kumar), शरद केळकर (sharad kelkar), सनी हिंदुजा, श्रेया धनवंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकुरसारख्या कलाकारांचा यात समावेश आहे.

the family man season 2
HBD करण जोहर; बॉलीवूडचा 'Unsuitable Boy'
the family man season 2
जातीवाचक बोलणं युविकाला पडलं महागात...

तामिळ सिनेमातील माइम गोपी, रवींद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंदसामी आणि एन. अलगमपेरुमल यांच्यासारखे दिग्गज कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com