साराशी 'त्याने' केलं गैरवर्तन, बॉडीगार्डला करावी लागली मध्यस्थी ; पाहा व्हिडीओ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

साराची फॅनफोलॉइंग दिवसेंदिवस वाढत आहे. आणि सेलिब्रिटींच्या चाहत्यांची कमीदेखील नाही. त्यामुळे हे चाहते बाहेर कुठे स्पॉट झाल्यावर त्यांना भेटण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढते. पण, अशाच एका क्रेझी फॅनने साराशी गैरवर्तन केलं. 

मुंबई : सारा अली खानने काही वेळ्तच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. मुलाखतींमधून तिची फन साइड नेहमीच दिसून येते. तिची फॅनफोलॉइंग दिवसेंदिवस वाढत आहे. आणि सेलिब्रिटींच्या चाहत्यांची कमीदेखील नाही. त्यामुळे हे चाहते बाहेर कुठे स्पॉट झाल्यावर त्यांना भेटण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढते. पण, अशाच एका क्रेझी फॅनने साराशी गैरवर्तन केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

कलाकरांचे जिमलूक किंवा एअरपोर्ट लुक चांगलेच व्हायरल होतात. याठिकाणी चाहत्यांचीही मोठी गर्दी असते. अनेकदा फोटो काढायला चाहते पुढे येतात, कलाकारही त्यांना प्रतिसाद देतात. पण, सारासोबत अशावेळीच एक गैरप्रकार झाला. सारा तिच्या जिममधून बाहेर येते. दरम्यान तिथे असणाऱ्या काही लोकांनी तिला फोटो काढण्याची विनंती केली. सारा पॅपराझी आणि तिच्या चाहत्यांशी नेहमीच नम्रपणे वागते आणि त्यांचा मान राखते. यावेळी देखील तीने चाहत्यांसह फोटो काढला. 

तिथला एक अतीउत्साही चाहता यावेळी पुढे सरसावतो, साराला हात मिळवतो. पण तो इथेच थांबला नाही तर तो साराच्या हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून सारा आश्र्यचकित होते. तिचा बॉडीगार्ड मध्यस्थी करुन त्या मुलाला लांब करतो. फोटोजर्नलिस्ट विराल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

People say ‘a leopard can’t change its spots.’ Ever thought- maybe it doesn’t want to??? 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा सध्या डेविद धवन यांच्या 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सैफ आणि दीपिका यांच्या 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वेल 'लव आजकल 2' मध्येही ती झळकणार आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना ती दिसणार आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेला पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. तर, 'कुली नंबर 1' 1 मे 2020 ला रिलिज होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fan misbehaved with sara ali khan video viral