'तुम्ही धुण्याभांड्याचे तरी काम देणार का?,' 'फँड्री'मधल्या 'शालू'ची पोस्ट चर्चेत

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली.
rajeshwari kharat
rajeshwari kharat Instagram

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली. या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिकंली. याच शालूची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. राजेश्वरीची 'रेड लाइट' नावाची एक शॉर्टफिल्म नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यावरच तिने ही पोस्ट लिहिली आहे.

राजेश्वरीची पोस्ट-

'तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या. स्त्रीने असे काम करणे योग्य नव्हे, परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही कामधंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतेस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो. गल्लीकडे येताना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडा वेळसाठीच खेळणं घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईलच्या रिचार्ज पेक्षा कमी किंमत देता. सर्वांना हे खेळणं आयुष्यात एकदातरी पाहिजे असतंच. पण कोणी याला कायमचं आपलं करून घेण्याची हिंमत ठेवतं का? नाही, कारण वेश्याव्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात. समाजात आणखी बर्‍याच काही गोष्टी वेश्यांबद्दल बोलल्या जातात, पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्तं ऐकून मजा घेतात. कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा, ज्या आपल्या घरातील माता-भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत,'

rajeshwari kharat
Diwali Special: रिंकूचं खास लूक; 'परश्या'ची कमेंट वाचाच!

राजेश्वरीच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी तिचं कौतुक केलं. 'खूप मोठं धाडस लागतं असली भूमिका करायला,' असं एकाने लिहिलं. तर 'चांगला मुद्दा मांडलास' असं दुसऱ्याने म्हटलं. 'फँड्री'नंतर राजेश्वरीने अॅटमगिरी या चित्रपटात भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना राजेश्वरीने 'फँड्री'मध्ये अत्यंत सहज अभिनय केला होता. ती मूळची पुण्याची असून तिचे वडील बँकेत नोकरी करतात. राजेश्वरीला एक बहीण व भाऊ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com