Fardeen Khan: लग्नाच्या १८ वर्षानंतर घटस्फोट घेतोय फरदीन खान? एकेकाळी विमानात केलेलं बायकोला प्रपोज

फरदीन खान लग्नाच्या १८ वर्षानंतर बायको नताशापासुन घटस्फोट घेण्याच्या चर्चांना उधाण आलंय
fardeen khan headed divorce with wife natasha madhvani after 18 years of marriage
fardeen khan headed divorce with wife natasha madhvani after 18 years of marriage SAKAL

Fardeen Khan Divorce News: बॉलीवुड हे असंं मायाजाल आहे जिथे नात्यांना खोटं मानलं जातं. ही नाती, संबंध हे अनेकदा तात्पुरतं असल्याचं वारंवार स्पष्ट झालंय. शाहरुख खान, अमिताभ बच्चन सारखे कलाकार अपवाद या गोष्टीला अपवाद आहेत.

पण बॉलीवुडमधली अनेक लग्न तुटली आहेत. मग ते मलायका अरोरा असो, सैफ अली खान ते अगदी ह्रतिक रोशन सारख्या कलाकारांनी त्यांच्या बायकोपासुन घटस्फोट घेतलाय.

अशातच अभिनेता फरदीन खानचं नाव यात जोडलं जातंय. फरदीन खान लग्नाच्या १८ वर्षानंतर बायको नताशापासुन घटस्फोट घेण्याच्या चर्चांना उधाण आलंय

(fardeen khan headed divorce with wife natasha madhvani)

fardeen khan headed divorce with wife natasha madhvani after 18 years of marriage
Bigg Boss OTT 2: तु धुतल्या तांदळासारखा नाहीस, एल्विशचे फॅन्स सलमानवर नाराज, वाचा संपूर्ण प्रकरण

फरदीन खान घेणार घटस्फोट?

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान आणि त्याची पत्नी नताशा माधवानी यांच्याबद्दल असे बोलले जात आहे की, दोघांचं नातं सध्या बिनसलं आहे. फरदीनची बायको ही अभिनेत्री मुमताजची मुलगी नताशा आहे. फरदीन आणि नताशाने २००५ मध्ये लग्न केले.

आता लग्नाच्या 18 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात उलथापालथ झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. त्यामुळे फरदीन आणि नताशा लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे.

फरदीन - नताशाची लव्ह स्टोरी

फरदीन खान आणि नताशा लग्नाआधी एकमेकांना डेट करत होते. दोघांची प्रेमकहाणी नेमकी कधी सुरू झाली हे सांगता येणार नाही. पण फरदीनने अतिशय फिल्मी पद्धतीने नताशाला प्रपोज केले.

लंडनहून अमेरिकेला जात असताना फरदीन खानने नताशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. चालु विमानात गुडघ्यावर बसुन त्याने नताशासमोर प्रेमभावना व्यक्त केल्या होत्या.

fardeen khan headed divorce with wife natasha madhvani after 18 years of marriage
Vaibhav Mangale: कलावंत व्यक्त झाले तरी बोंब आणि... संभाजी भिंडेंच्या वक्तव्यानंतर वैभव मांगलेंची पोस्ट

फरदीन - नताशाचं लग्न

फरदीन आणि नताशा यांचं लग्न 13 डिसेंबर 2005 रोजी मुंबईतील सांताक्रूझ येथे झाला. फरदीनचे वडील दिग्गज अभिनेते फिरोज खान होते.

सर्वप्रथम नताशा माधवानी, ही ७०-८० च्या दशकातील सुपरहिट हिरोईन मुमताजची मुलगी आहे. मुमताजला दोन मुली आहेत. तान्या आणि नताशा. ज्येष्ठ अभिनेत्री मुमताजने 1974 मध्ये मयूर माधवानीसोबत लग्न केले.

आता फरदीन आणि नताशा घटस्फोट घेत असल्याच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com