'आता हा डोक्यात गेलायं, तु तुझ्या घरचा पत्ता दे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farhan akhtar ask troller

'आता हा डोक्यात गेलायं, तु तुझ्या घरचा पत्ता दे'

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता फरहान अख्तर हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरही त्याचा बोलबाला असतो. कायम लाईमलाईटमध्ये वावरणारा फरहान हा त्याच्या परखड स्वभावाबद्दलही प्रसिध्द आहे. आपण व्यक्त केलेल्या मतांवर ठाम राहून समाजातील वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य करायला त्याला आवडते. आता त्याची अशीच एक पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र त्यावरुन त्याला एका ट्रोलर्सनं जेरीस आणल्यानं त्याची सहनशक्ती संपली आहे. त्यामुळे त्याची चिडचिड वाढल्याचे दिसून आले आहे.

फरहाननं जी एक पोस्ट व्हायरल केली होती त्याला एका ट्रोलर्सनं वेगळ्या कमेंट दिल्या होत्या. ट्रोलर्सच्या निशाण्यावर असणा-या फरहानला त्या ट्रोलर्सला कसं उत्तर द्यावं असा प्रश्न पडला होता. त्यावर त्यानं जे काही केलं ते भन्नाट आहे. तुम्हाला कदाचित फरहानचे उत्तर ऐकल्यावर धक्का बसेल. मात्र त्यानं त्या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले आहे. त्याचे ते व्टिट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला फरहानच्या फॅन्सचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसून आला आहे. फरहानचे ते व्टिट कोरोना व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत होते.

त्याचे झाले असे की, फरहाननं कोरोना व्हॅक्सिनची किंमत वाढविण्यावर एक प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे तो सर्वांच्या टीकेचा विषय़ ठरला होता. यावरुन तो ट्रोलही झाला होता. ज्यावेळी सरकारनं त्या व्हॅक्सिनची किंमत कमी करण्याविषयी घोषणा केली होती तेव्हा त्यानं पुन्हा एकदा व्टिट केले होते. त्यावेळी त्यानं आपल्यावर टीका करणा-या ट्रोलर्सला उत्तरं दिली होती. फरहाननं त्याच्या व्टिटमध्ये लिहिले होते की, माझ्या प्रेमळ ट्रोलर्स मित्रा, आता सरकारपण कोरोना व्हॅक्सिनची किंमत कमी करण्यासाठी विचारत आहे. मला माहिती आहे अशावेळी तुम्ही सरकारलाही त्यावर एक मोठं लेक्चर्स द्यायला कमी करणार नाही.

मला तुम्ही जो सल्ला देत होता तोपर्यत तुम्ही मास्क घालायला हवा होता. आता एक काम करा, घरीच राहा. तुमचं तोंड धुवा. मला म्हणायचं होतं हाथ देखील. मात्र त्यानंतरही त्या ट्रोलर्सचे आणि फरहानचे वाद होतच राहिले. शेवटी कंटाळलेल्या फरहाननं त्या ट्रोलर्सला त्याच्या राहत्या ठिकाणाची चौकशी केली. फरहानच्या या व्टिटला त्याच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: Farhan Akhtar Ask Troller Address After His Comment On Covid 19 Vaccine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
go to top