Farmani Naaz New Song : ‘हर घर तिरंगा’ गाण्यातून दिला हिंदू-मुस्लिमांना खास संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmani Naaz New Song News

Farmani Naaz : ‘हर घर तिरंगा’ गाण्यातून दिला हिंदू-मुस्लिमांना खास संदेश

Farmani Naaz New Song News १५ ऑगस्ट जवळ आला आहे. देशात ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवली जात आहे. मोहिमेत फरमानी नाझही (Farmani Naaz) सहभागी झाली आहे. फरमानीचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ज्यामध्ये ती ‘हर घर तिरंगा’ फडकवण्याचे आवाहन करीत आहे. गाण्याचे (Song) नाव आहे ‘हर घर तिरंगा’ असे आहे. १५ ऑगस्टपूर्वी आलेले फरमानीचे हे गाणे चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नाही.

फरमानी नाझच्या (Farmani Naaz) इतर गाण्यांप्रमाणे हे गाणेही रिलीज होताच व्हायरल होऊ लागले आहे. हे गाणे फरमानी नाझ आणि फरमान नाझ यांनी गायले आहे. गीतकार अनुज मुल्हेरा आहे. संगीत परविंदर सिंग यांनी दिले आहे. देशभक्तीने भरलेल्या या गाण्यात फरमानी नाझने हिंदू-मुस्लिम (Hindu) बंधुता आणि एकतेचा संदेश दिला आहे.

फरमानीचा हा संदेश खास आहे. कारण, यापूर्वी तिने शिवभजन गायले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. ‘हर हर शंभू’ गाण्यावर (Song) मुस्लिम कट्टरतावादी फरमानी नाझवर संतापले होते. ‘हर घर तिरंगा’ या गाण्यात फरमानी नाझ हिंदू-मुस्लिम (Muslim) एकतेचा संदेश देताना म्हणाली, ‘नफरत को हम दूर करेंगे, प्यार दिलों में इतना भरेंगे. पैगाम हम लाएंगे, हम सबको सुनाएंगे, घर घर लहराएंगे, तिरंगा प्यारा, ये देश हमारा है जान से प्यारा.’

या गाण्यात फरमानीने देशाला स्वच्छ व नशामुक्त करण्याचे आवाहन केले आहे. सर्व देशवासीयांना हा ठराव घेण्यास सांगितले आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये फरमानी नाझ तिच्या टीमसोबत दिसत आहे. सर्व देशभक्तीच्या रंगात रंगले आहेत. फरमानीने तिरंगा फेटा, दुपट्टा परिधान केला आहे. तिचे बाकीचे सहकारी तिरंगा ध्वज फडकवताना दिसले.

लोकांना गाणे आवडले

फरमानीच्या या गाण्याला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. संगीताला कोणताही धर्म नसतो, असे एकाने लिहिले. दिल खुश झाले हे गाणे ऐकून. फरमानी नाझ आणि टीमला सलाम, असे दुसऱ्याने लिहिले. सोशल मीडियावर युजर्स फरमानीची स्तुती करीत आहे. फरमानीचे आधी आलेले ‘हर हर शंभू’, ‘हरे हरे कृष्णा’ या गाण्याला जबरदस्त यश मिळाले. ‘हर हर शंभू’ हे भजन म्हणजे फरमानीला रातोरात सोशल मीडिया स्टार बनवले.

टॅग्स :MessagemusicHindu Muslim