प्रसिद्ध फॅशन डिझायनर शरबरी दत्तांचं निधन, घरातील बाथरुममध्ये आढळला मृतदेह

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 18 September 2020

शरबरी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरातील बाथरुममध्ये गुरुवारी रात्री उशिरा आढळून आला. मात्र अजुन पर्यंत शरबरी यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

मुंबई- प्रसिद्ध फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा कोलकाता येथील त्यांच्या राहत्या घरी मृत्यु झाला. शरबरी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरातील बाथरुममध्ये गुरुवारी रात्री उशिरा आढळून आला. मात्र अजुन पर्यंत शरबरी यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांना माहिती मिळताच ते लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला.

हे ही वाचा: चाहत्याने बनवलेला सुशांत सिंह राजपूतचा वॅक्स स्टॅचू पाहिलात का? याआधी अमिताभ-विराटचेही बनवलेत स्टॅचू  

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरबरी यांचा मृतदेह रात्री सव्वा बाराच्या आसपास आढळून आला. याची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाली होते. शरबरी यांच्या कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की ६३ वर्षीय फॅशन डिझायनरला शेवटचं मंगळवारी रात्री डिनरच्या वेळेस पाहिलं गेलं होतं.त्यानंतर त्यांनी कोणाशीही बातचीत केली नाही.

या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की शरबरी यांचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की त्या अगदी व्यवस्थित होत्या आणि असं काहीच नव्हतं. या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिस करत आहेत आणि शरबरी यांच्या अचानक झालेल्या मृत्युचं कारण शोधत आहेत. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 

शरबरी दत्ता सुप्रसिद्ध बंगाली कवी अजित दत्ता यांची मुलगी होती. शरबरी कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध फॅशन डिझायनर होत्या. त्या खासकरुन पुरुषांच्या एथनिक वेअरच्या डिझाईन्ससाठी ओळखल्या जायच्या. असं म्हटलं जातं की शरबरी यांनी पहिल्यांदा बंगाली पुरुषांसाठी रंगीत धोतर आणि डिझायनर पंजाबी कुर्ता या ड्रेसिंगला फॅशन जगतात ओळख मिळवून दिली होती.    

fashion designer sharbari dutta found dead at her south kolkata residence  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fashion designer sharbari dutta found dead at her south kolkata residence