esakal | चाहत्याने बनवलेला सुशांत सिंह राजपूतचा वॅक्स स्टॅचू पाहिलात का? याआधी अमिताभ-विराटचेही बनवलेत स्टॅचू
sakal

बोलून बातमी शोधा

sushant

पश्चिम बंगालमध्ये सुशांतच्या एका चाहत्याने त्याचा वॅक्स स्टॅचू बनवला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आठवणीत त्याने अशाप्रकारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

चाहत्याने बनवलेला सुशांत सिंह राजपूतचा वॅक्स स्टॅचू पाहिलात का? याआधी अमिताभ-विराटचेही बनवलेत स्टॅचू

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूतचे जगभरातील चाहते त्याची कोणत्या ना कोणत्याप्रकारे आठवण काढतंच आहेत. त्याच्या चाहत्यांनी बनवलेले कित्येक स्केच आणि पेंटिग्स आत्तपर्यंत समोर आले आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये सुशांतच्या एका चाहत्याने त्याचा वॅक्स स्टॅचू बनवला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आठवणीत त्याने अशाप्रकारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. हा वॅक्स स्टॅचू खूप चर्चेत आहे.

हे ही वाचा: दिशा सालियनच्या शेवटच्या कॉलचं सत्य उघडकीस, १०० नंबरवर नाही तर 'या' व्यक्तीला केला होता शेवटचा कॉल

स्टॅचू बनवणारे आसनसोलचे राहणारे सुकांतो रॉय सांगतात, 'मला तो खूप आवडायचा. त्याचं या जगात नसणं खूपंच दुःखी करणारं आहे. मी त्याचा स्टॅचू म्युझियमसाठी बनवला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला हवं असल्यास मी आणखी एक बनवून देईन.'

सुशांतचा वॅक्स स्टॅचू बनवणा-या सुकांतो रॉय यांनी याआधी अमिताभ बच्चन, विराट कोहली सारख्या सेलिब्रिटींचे देखील स्टॅचू बनवले आहेत जे खूप चर्चेत होते. हे स्टॅचू म्युझियमच्या एक्सक्लुझिव्ह कलेक्शनमध्ये आहेत. सुशांतचा हा स्टॅचू त्याच्या डेनिम जॅकेट, सफेद टी शर्ट या लूकवरुन बनवण्यात आला आहे.  सुशांतसाठी जगभरातील चाहते भावूक आहेत.सुशांतच्या आठवणीत त्याला श्रद्धांजली म्हणून कोणी झाडं लावल आहे तर कोणी गरजुंना अन्नदान करत आहेत.   

sushant singh rajput west bengal fan creates his wax statute for museum