Fast And Furious 9: जॉन सिनाचा खतरनाक अंदाज, ट्रेलर पाहाच !

वृत्तसंस्था
Saturday, 1 February 2020

बहुचर्चित आणि बहुप्रक्षेपित 'फास्ट अॅण्ड फ्युरिअस' चा ट्रेलर रिलिज झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळतोय. फास्ट अॅण्ड फ्युरिअसच्या 9 व्या भागामध्ये काय आहे हे एकदा जाणून घ्या ! 

मुंबई : बॉलिवूडमध्ये नव्या वर्षासह मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता इंग्रजी चित्रपटांचीही भर पडली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रक्षेपित 'फास्ट अॅण्ड फ्युरिअस' चा ट्रेलर रिलिज झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळतोय. फास्ट अॅण्ड फ्युरिअसच्या 9 व्या भागामध्ये काय आहे हे एकदा जाणून घ्या ! 

जॅकी श्रॉफच्या आयुष्यात बायकोशिवाय होती 'ती' दुसरी व्यक्ती !

फास्ट अॅण्ड फ्युरिअसचा या नव्या सिरिजचं नाव 'F 9 Fast saga' असं आहे. या सिनेमाचा नववा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्यामुळे या नवव्या भागात काहीतरी खास पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता होती. त्याचीच पुर्ती करत फास्ट अॅण्ड फ्युरिअसने चाहत्यांसाठी एक खास सरप्राइज दिलं आहे. 

फास्ट अॅण्ड फ्युरिअसच्या नवव्या भागामध्ये  WWE चा स्टार जॉ़न सीना या सिनेमामध्ये असणार आहे. थ्रिलिंग आणि अॅक्शन असणाऱ्या या सिनेमामध्ये जॉन सीनाला पाहणे चाहत्यांसाठी एक उत्सुकतेची बाब असणार आहे. हा सिनेमाची खासियत आहे की त्यामध्ये गाड्या, रेस आणि अॅक्शन भरपूर आहे. पण, सिनेमाच्या नवव्या भागाने यावेळी एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. कारण, या भागामध्ये सिनेमातील गाड्या चक्क रस्त्य़ावर नाही तर, हवेत उडताना दिसणार आहेत. 

चार मिनीटांचा हा ट्रेलर श्वास रोखणारा आहे. यावेळीही F 9 ची टीम एका जबरदस्त मिशनवर निघाली आहे. यावेळी त्यांचं मिशन खडतर करण्यासाठी जॉन सीना आला आहे. सिनेमामध्ये मिशेल रॉड्रिग्ज़, जॉर्डाना ब्रूस्टर, टायरिस गिब्सन,लूडैकरिस आणि  नताली एमेनुअल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

सैफ म्हणतो, ''करीनामुळेच तैमुर बिघडला आहे''

भारतामध्ये हा सिनेमा इदेच्यावेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे काही दमदार पोस्टरही रिलिज करण्यात आली आहे. भारतामध्ये हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमध्ये 22 मे ला रिलिज होणार आहे. बॉलिवूडच्या 'राधे' आणि 'लक्ष्मी बॉंब' या सिनेमांना F 9 Fast saga' टक्कर देणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fast And Furious 9 trailer out