
मुलीच्या किसिंग सीनवर वडिल काय म्हणतील?, आईनं दिल उत्तर...
मुंबई - बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत की ज्यांच्या मुलांनी त्याच क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांची तुलना त्यांच्या अभिनेता आई वडिलांशी कऱण्यात आली होती. सध्याच्या काळात अनेक सेलिब्रेटींची मुले चित्रपट क्षेत्रात आली आहेत. वेबसिरीजच्या माध्यमातून त्यांनी या नव्या माध्यमात प्रवेश केला आहे. प्रसिध्द अभिनेता संजय कपूर यांच्या मुलीनं एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय कपूरची (sanjay kapoor) मुलगी शनाया कपूर (shanaya kapoor) सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. त्याला कारणही तसचं आहे. ती आता लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरच्या एका चित्रपटामध्ये ती दिसणार आहे. यापूर्वीही ती स्टार किड (star kid) म्हणून ट्रोलही झाली होती. मात्र त्याचा काही एक परिणाम तिच्यावर झाला नाही. आपण ट्रोलर्सचा जास्त विचार करत नसल्याचे तिनं सांगितले आहे.
हेही वाचा: पूजाची गोष्टच निराळी, फोटोंवरुन नजर हटते कुठे?
हेही वाचा: दरवेळी ईदचीच 'कमिटमेंट' का? सलमानचं 'टॉप सिक्रेट'
शनायाची आई महिपनं (mahip kapoor) काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी शनायाच्या आगामी प्लॅन्सविषयी सांगितले. जर शनायाला तिच्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन करावा लागला तर तिच्या वडिलांची काय प्रतिक्रिया असेल. त्यावर महिप यांनी सांगितलं, संजय यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र मुलीच्या भविष्याबाबत ते फारसा हस्तक्षेप करणार नाहीत. असे मला सांगावेसे वाटते.
Web Title: Father Sanjay Kapoor Reaction To Shanaya Bold
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..