दरवेळी ईदची 'कमिटमेंट' का? सलमानचं 'टॉप सिक्रेट' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman khan

दरवेळी ईदचीच 'कमिटमेंट' का? सलमानचं 'टॉप सिक्रेट'

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या हटकेपणासाठी प्रसिध्द आहे. त्याच्या चित्रपटाची चर्चा नेहमीच होत असते. सध्या सोशल मीडियावर त्याच्या आगामी राधे युवर मोस्ट वाँटेडची हवा आहे. येत्या ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Radhe Your Most Wanted Bhai ) सलमानचे बहुतांशी चित्रपट हे ईदच्या दिवशी प्रदर्शित झाले आहे. तो त्याचा ठरलेला एक पॅटर्न आहे. त्यामुळे त्याची वेगळी ओळखही बॉलीवूडमध्ये आहे. यात विशेष बाब म्हणजे ज्यावेळी सलमानचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो त्यावेळी आणखी कुठला चित्रपट शक्यतो प्रदर्शित होत नसल्याचे आतापर्यत दिसून आले आहे.

गेल्या दहा वर्षांपासून सलमानचा हा वेगळा पॅटर्न कमालीचा यशस्वी झाला आहे. त्याच्या चाहत्यांचा त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. Radhe Your Most Wanted Bhai हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सलमाननं आतापर्यत त्याची ईदची कमेटमेंट पाळली आहे. त्याला त्यानं तडा जाऊ दिलेला नाही. त्याचा राधे नावाचा चित्रपट खरं तर गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाचा फटका त्याला बसला. आणि त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.

अनेक चित्रपट विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की, सलमानचा प्रत्येक चित्रपट हा काही ईदच्या दिवशी प्रदर्शित होत नाही. त्याला काही अपवादही आहेत. ईदच्या वेळी त्याचा पहिला चित्रपट जो प्रदर्शित झाला होता त्याचे नाव वाँटेड (Wanted) असे आहे. तो 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट काही ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करायचा नव्हता. मात्र काही तांत्रिक अडणीमुळे तो गोंधळ झाला होता. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. खरं तर यापूर्वी सलमानचे या चित्रपटापूर्वी गॉड तुसी ग्रेट हो, हिरोज, युवराज चित्रपट फ्लॉप झाले होते. मात्र वाँटेडनं त्याला मोठं यश मिळवून दिलं. तेव्हापासून त्याचं आणि ईदचं समीकरण दाट झालं.

2010 मध्ये सलमानचा दबंग (Dabang) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. त्यानंतर 2011 मध्ये आलेला बॉडीगार्डही (Bodygaurd) ईदच्या वेळी प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटानं 149 कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. 2012 मध्ये टायगर जिंदा है (Tiger Zinda hai) प्रदर्शित झाला. त्यानं 200 कोटींचा बिझनेस केला होता. त्यापुढे 2014 मध्ये किकनं सलमानला जबरदस्त लोकप्रियता मिळवून दिली.

हेही वाचा: मराठी अभिनेत्याची एक्स्प्रेस वेवर लूट; ५० हजार रुपये घेऊन आरोपी पसार

हेही वाचा: 'माझ्या वडिलांना वाचवता आलं असतं'; संभावना सेठने व्यक्त केलं दु:ख

2015 मध्ये सलमानचा बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijan) प्रदर्शित झाला होता. कबीर खाननं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं 321 कोटींचा बिझनेस केला होता. 2019 मध्ये ईदच्या निमित्तानं त्याचा भारत पडद्यावर आला. त्या चित्रपटानं 209 कोटींचा बिझनेस केला होता.

Web Title: Salman Khan Films Released On Eid From Wanted To Bharat Top

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top