The Kerala Story Video : पश्चिम बंगाल सरकारविरुद्ध कायदेशीर लढा लढू; बंदीनंतर 'केरळ स्टोरी'च्या निर्मात्याचा इशारा

The Kerala Story News
The Kerala Story Newsesakal

नवी दिल्लीः 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर आज पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटावर बंदी आणली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "राज्यात शांतता राखण्यासाठी तसेच द्वेष आणि हिंसाचार टाळण्यासाठी द केरळ स्टोरी या सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे"

The Kerala Story News
Lithium Reserves: राजस्थानात सापडला लिथिअमचा मोठा साठा! भारताच्या बॅटरी क्षेत्रात होणार क्रांती

चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांना याबाबत विचारलं असता, ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी असा निर्णय घेतला असेल तर आम्ही कायदेशीर कारवाई करु. कायद्याच्या तरतुदीनुसार जे शक्य असेल ते आम्ही करु, असं शाह म्हणाले.

चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहे. त्यामुळे, त्याच्या OTT प्रीमियरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तरी या चित्रपटाची OTT प्रीमियरची तारीख सध्या माहीत नाही. तरी देखील हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दिड महिन्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

The Kerala Story News
Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये; अजित पवारांनी दरडावलं

तामिळनाडूत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी

दरम्यान, यापूर्वी देशात तामिळनाडू या राज्यात पहिल्यांदा या सिनेमावर बंदी करण्यात घालण्यात आली आहे. पण तामिळनाडूच्या सरकारकडून नव्हे तर थिएटर्स असोसिएशननंच हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाबाबत थिएटर्स अँड मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. सुब्रमण्यम यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, काही मल्टिप्लेक्सनं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध स्टार कोणीही नसल्यानं सुरुवातीला या चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com