Fighter Teaser: हृतिक - दीपिकाच्या 'फायटर' टीझरवर कमेंट्सचा पाऊस, पंतप्रधान मोदींशी होतीय तुलना

पंतप्रधान मोदी आणि हृतिकच्या 'फायटर'ची तुलना होतेय
Fighter Teaser gets Comparisons with Prime Minister narendra Modi hrithik roshan deepika padukon
Fighter Teaser gets Comparisons with Prime Minister narendra Modi hrithik roshan deepika padukonSAKAL
Updated on

Fighter Teaser: हृतिक रोशन - दीपिका पदुकोणच्या 'फायटर' सिनेमाच्या टीझरने अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. फायटर सिनेमाचा थरारक टिझर लोकांनी अक्षरक्षः डोक्यावर घेतलाय. फायटर सिनेमाचा टीझर इतका जबरदस्त आहे तर सिनेमा सुद्धा भन्नाट असेल यात शंका नाही.

अशातच फायटर सिनेमाचा टीझर पाहून पंतप्रधान मोदींशी तुलना केली जातेय. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

(Fighter Teaser gets Comparisons with Prime Minister narendra Modi)

Fighter Teaser gets Comparisons with Prime Minister narendra Modi hrithik roshan deepika padukon
Fighter Teaser: वंदे मातरम! हृतिक - दीपिकाच्या 'फायटर'चा थरारक टीझर रिलीज

फायटरचा टीझर आणि मोदींशी तुलना

काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेजस फायटर प्लेन चालवण्याचा अनुभव घेतला होता. आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन फोटो शेअर करत पंतप्रधानांनी याबाबत माहिती दिली.

या अनुभवामुळे आपला देशाच्या क्षमतेवरील विश्वास वाढला आहे. आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहोत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. मोदींचे युनिफॉर्ममधले फोटो व्हायरल झाले होते. मोदींनी सुद्धा युनिफॉर्म परिधान करुन तेजसचं उड्डाण केलेलं

आता फायटरचा टीझर पाहून सुद्धा नेटकऱ्यांना मोदींची आठवण येतेय. त्यामुळे फायटरच्या टीझरची मोदींशी तुलना केली जातेय.

फायटरचा टीझर रिलीज

हृतिक रोशन - दीपिका पदुकोण - अनिल कपूर यांच्या फायटर टीझरमध्ये सुरुवातीला हृतिक रोशन चालत येत असलेला दिसतो. पुढे वायुसेनेची थरारक कामगिरी पाहायला मिळते. टीझरमध्ये दीपिका - अनिल कपूर सुद्धा तडफदार भूमिकेत पाहायला मिळतात.

टीझरच्या शेवटी हृतिकच्या मागे भारताचा तिरंगा बघून अंगावर रोमांच उभे राहतात. एकूणच फायटर सिनेमा थिएटरमध्ये पाहणं ही सर्वांसाठी पर्वणी असणार यात शंका नाही.

फायटरची रिलीज डेट

फायटर सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २६ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. पठाण सिनेमा २०२३ ला प्रजासत्ताक दिनाला रिलीज झाला होता. पठाणने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. त्यामुळे आता सिद्धार्थचा फायटर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com