दीपिका पदूकोणनंतर ड्रग कनेक्शनमध्ये आता दिया मिर्झाचं नाव आलं समोर, NCB करणार चौकशी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 22 September 2020

सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पदूकोण यांच्यानंतर आता बॉलीवूडची आणखी एक मोठी अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आहे. ही अभिनेत्री दिया मिर्झा असल्याचं म्हटलं जातंय.

मुंबई-  सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग कनेक्शनशी संबंधित आता बॉलीवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर यायला सुरुवात झाली आहे. सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पदूकोण यांच्यानंतर आता बॉलीवूडची आणखी एक मोठी अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आहे. ही अभिनेत्री दिया मिर्झा असल्याचं म्हटलं जातंय.

हे ही वाचा: 'सुशांतच्या मृत्युचा मुद्दाच भटकला', कंगनावर भडकल्या रेणुका शहाणे  

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या रडावर असलेली ही अभिनेत्री २००५, २००६ च्या काळातील असल्याचं कळालं होतं.. एनसीबीच्या सुत्रांच्या म्हणण्याप्रमाणे अटकेत असलेल्या अनुज केशवानी आणि अंकुश या ड्रग्स पेडलर्सच्या चौकशीनंतर अभिनेत्री दिया मिर्झाच्या नावाचा खुलासा झाला आहे. दियाची मॅनेजर ड्रग्सचे पॅकेट्स तिच्यापर्यंत पोहोचवायची. दियाची मॅनेजर ड्रग्स पेडलर अनुजची गर्लफ्रेंड देखील होती असं म्हटलं जातंय.  

२०१९ मध्ये दियासाठी खरेदी केलेल्या ड्रग्सची माहिती आणि पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, दियाच्या मॅनेजरने ड्रग्स पेडलरसोबत एक-दोनवेळा मिटींग देखील केली होती. त्यामुळे येणा-या दिवसात आधी मॅनेजरला चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं आणि त्यानंतर या अभिनेत्रीला देखील एनसीबी समन्स पाठवू शकते. 

एनसीबीच्या या तपासात जया साहाने बॉलीवूडच्या ड्रग लिंकचा खुलासा केला आहे. यामध्ये आत्तापर्यंत दीपिका पदूकोण, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर यांची नावं समोर आली आहेत. जया साहा चौकशीत यांसोबत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची भांडोफोड करणार असल्याचं दिसतंय. दिया मिर्झाच्या नावामुळे पुन्हा एकदा सिनेइंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.   

film actress dia mirza on ncb radar she can be called for questioning


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: film actress dia mirza on ncb radar she can be called for questioning