Film critic Kaushik LM: धनुष, विजय देवरकोंडा भावूक! 'आमचा लाडका मित्र...'

फिल्म समीक्षक अशी ओळख असलेल्या कौशिक एल एमच्या नावाचा दबदबा मोठा होता. त्यानं अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली होती.
Film critic Kaushik LM passed away
Film critic Kaushik LM passed away esakal
Updated on

Kaushik LM- फिल्म समीक्षक अशी ओळख असलेल्या कौशिक एल एमच्या नावाचा दबदबा मोठा होता. त्यानं अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता त्याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याचं निधन (tollywood news) झालं आहे. सोशल मीडियावर तो इन्फ्ल्युंसर म्हणून प्रसिद्ध होता. वेगवेगळ्या चित्रपटांचा आपल्या हटके स्टाईलनं रिव्ह्यु करणारा कौशिक एल (entertainment news) एम आता कालवश झाला आहे. त्याच्या निधनानं टीव्ही मनोरंजन आणि चित्रपट विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. कौशिकच्या जाण्याचं वृत्त कळताच प्रसिद्ध अभिनेता धनुष आणि विजय देवरकोंडा भावूक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या या मित्रांप्रती श्रद्धांजली वाहिली आहे.

कार्तिकच्या निधनानं टॉलीवूड विश्वात शोककळा पसरली आहे. त्याचा (social media viral news) हदयविकाराच्या झटक्यानं मृत्यु झाला आहे. सोशल मीडियावर कार्तिकची मोठी ओळख होती. तो फिल्म रिव्ह्यु यामुळे तो लाईमलाईटमध्ये आला होता. आगळी वेगळी शैली आणि तरुणाईला समजेल अशा पद्धतीनं चित्रपटाचं समीक्षण करण्यात कार्तिकचा हातखंडा होता. तो केवळ एक चांगला समीक्षक नाही तर, स्तंभलेखक, ट्रेकरही होता. त्याचा चाहतावर्गही मोठा होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते.

Film critic Kaushik LM passed away
Rakesh Zunzunwala : मोदींशी भेट अन् चुरगळलेला शर्ट, काय होतं झुनझुनवाला यांच्या Viral Photo मागचं रहस्य

सोशल मीडियावरुन त्याच्या हजारो चाहत्यांनी त्याच्याप्रती शोक व्यक्त केला आहे. त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशनं लिहिलं आहे की, मी जेव्हा कौशिकची बातमी ऐकली तेव्हा मला धक्काच बसला. मला अजुनही विश्वास ठेवणं कठीण जातं आहे. तो माझा एक चांगला मित्र होता. त्याच्या आणि त्याच्या कुटूंबाप्रती माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता धनुष आणि विजय देवरकोंडानं देखील कौशिकला आदरांजली वाहिली आहे. आमचा लाडका मित्र आमच्यातून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Film critic Kaushik LM passed away
Raju Srivastava Health Update: 'तो आता...' सेक्रेटरीची प्रतिक्रिया चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com