esakal | चित्रपट समीक्षक राजीव मसंद व्हेंटिलेटरवर; कोरोनामुळे खालावली प्रकृती
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Masand

चित्रपट समीक्षक राजीव मसंद व्हेंटिलेटरवर; कोरोनामुळे खालावली प्रकृती

sakal_logo
By
स्वाती वेमूल

सुप्रसिद्ध पत्रकार, चित्रपट समीक्षक आणि धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मसंद यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे त्यांची प्रकृती खालावली असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अतिदक्षता विभागात हलवल्यानंतरही त्यांच्या फुफ्फुसाचा संसर्ग मी होत नव्हता, म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राजीव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं.

राजीव मसंद यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकारिता सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीचं (डीसीए) सीईओ पद त्यांना देण्यात आलं होतं.

राजीव हे ४२ वर्षांचे असून गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपट पत्रकारितेत काम करत आहेत. त्यांचा 'मसंद की पसंद' हा कार्यक्रम चांगलाच प्रसिद्ध होता. या कार्यक्रमात ते विविध चित्रपटांचं समीक्षण करत असत. त्यांची चित्रपट समीक्षणाची शैली अनेकांना आवडते.

loading image