'रॉकेट बॉईज' सुसाट... 'गुल्लक'ची फिल्मफेयरमध्ये बाजी! 'जितूभैय्या'ला... वाचा पूर्ण यादी|Filmfare OTT Awards | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Filmfare OTT Awards

Filmfare OTT Awards: 'रॉकेट बॉईज' सुसाट... 'गुल्लक'ची फिल्मफेयरमध्ये बाजी! 'जितूभैय्या'ला... वाचा पूर्ण यादी

Filmfare OTT Awards viral list rocket boys to gullak: ओटीटीची क्रेझ ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही वर्षापासून विशेषत, कोरोनाच्या दरम्यान ओटीटीनं प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले होते. आता टीव्ही मनोरंजन विश्वात ओटीटीचे स्थान महत्वाचे झाले आहे. भारतीय बाजारपेठेत तर या माध्यमानं कमाल केली आहे.

वेबसीरिजचा चाहतावर्ग मोठा आहे. थिटएर चित्रपट पाहायला जाण्याऐवजी ओटीटीवर वेबसीरिज आणि चित्रपट पाहण्याचे प्रमाण तुलनेनं वाढल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या वर्षी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या मालिकांचे विषय देखील प्रेक्षकांना भावले, कौटूंबिक, विज्ञान, साहित्य, राजकारण ते क्राईम थ्रिलर पर्यत वेगवेगळ्या विषयांवरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. यात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मालिकांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

फिल्मफेयर ओटीटी अॅवॉर्डसमध्ये टाबर, गुल्लक सीझन ३ आणि पंचायत २ या मालिकांची सरशी झाली आहे. यासगळ्यात जीम सारभा आणि इश्वाक सिंह यांच्या रॉकेट बॉईजनं बाजी मारली आहे. या मालिकेनं सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे. या मालिकेला बेस्ट अॅक्टर, ड्रामा, क्रिटिक्स (मेल) पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रॉकेट बॉईजला एकुण ८ अॅवॉर्डस मिळाले असून त्यामध्ये बेस्ट सीरिज आणि बेस्ट डायरेक्टर अॅवॉर्डही मिळाला आहे.

गुल्लकनंही मारली बाजी -

मुंबईमध्ये झालेल्या फिल्मफेयर ओटीटी पुरस्कार सोहळ्याला मनोरंजन विश्वातील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. यावेळी टाबर आणि गुल्लकची सर्व टीमही हजर होती. गुल्लकला तीन पुरस्कार मिळाले. जमील खान आणि गीतांजली कुलकर्णी यांना बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला आहे.

कोणाला मिळाले पुरस्कार, वाचा पूर्ण यादी

बेस्ट सीरिज - रॉकेट बॉईज

बेस्ट क्रिटिक्स - टाबर

बेस्ट डिरेक्टर्स - अभय पन्नु (रॉकेट बॉईज)

बेस्ट डायरेक्टर सीरिज क्रिटिक्स - अजितपाल सिंग (टाबर)

बेस्ट अॅक्टर - पवन मल्होत्रा (टाबर)

बेस्ट अॅक्टर (ड्रामा, क्रिटिक्स मेल) - जिम सारभा (रॉकेट बॉईज)

बेस्ट अॅक्टर (फिमेल, ड्रामा) - रविना टंडन (आरण्यक)

बेस्ट ड्रामा क्रिटिक्स (फिमेल) - साक्षी तलवार (माई)

------------------------------------------------------------------

बेस्ट अॅक्टर - सीरीज मेल - कॉमेडी - जमील खान (गुल्लक सीझन ३)

बेस्ट अॅक्टर कॉमेडी क्रिटिक्स - मेल - जितेंद्र कुमार (पंचायत सीझन ३)

बेस्ट अॅक्टर कॉमेडी - फिमेल - गीतांजली कुलकर्णी (सीझन ३)

बेस्ट अॅक्टर- कॉमेडी - क्रिटिक्स (फिमेल) - मिथिला पालकर (लिटल थिंग्ज सीझन ४)

-----------------------------------------------------------------------------------------------