चित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे निधन

वृत्तसंस्था
रविवार, 23 सप्टेंबर 2018

मुंबई- चित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज (ता. 23) निधन झाले. धिरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना किडनीच्या कॅन्सरने ग्रासले होते. लाजमी यांनी आज पहाटे 4.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन महिन्यात त्यांचा हा आजार आणखीच बळावला होता. किडनीसोबतच लिव्हरच्या आजाराचाही त्यांना त्रास होत होता.

कल्पना लाजमी यांच्या उपचारासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना कोकिळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले असता सलमान खान, आमिर खान, रोहित शेट्टी आणि इंडियन फिल्म्स अ‍ॅण्ड टेलिव्हीजन डायरेक्टर्स असोसिएशनने त्यांच्या उपचाराचा खर्च उचलला होता. प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांच्या त्या कन्या होत्या. चित्रपट निर्माते गुरुदत्त त्यांचे मामा होते. 

कल्पना यांनी हजारिका यांच्या आयुष्यावर 'भूपेन हजारिका: अॅज आय न्यू हिम' नावाचे पुस्तकही लिहिले होते. कल्पना यांनी सहाय्यक दिग्दर्शनातून कलाविश्वात पदार्पण केले. श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कल्पना यांनी 'एक पल', 'रुदाली', 'चिंगारी', 'दमन' यासारख्या बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. रूदाली या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 2001 मध्ये आलेल्या कल्पना यांच्या दमन या चित्रपटासाठी अभिनेत्री रवीना टंडनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

कल्पना लाजमी यांचे चित्रपट हे स्त्री केंद्रित असायचे. 2006 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला चिंगारी हा लाजमी यांचा अखेरचा सिनेमा ठरला. 2006 नंतर त्यांनी कुठलाही चित्रपट दिग्दर्शित केला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filmmaker Kalpana Lajmi Passes Away