esakal | पायल रोहतगीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

actress payal rohatagi

पायल रोहतगीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

नेहरू-गांधी कुटुंबाविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कथित बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात Payal Rohatgi पुण्यात Pune एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पुणे नगर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 36 वर्षीय पायलवर याआधीही देशातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खटला दाखल झाल्यानंतर पायलला कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे.

पुणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते रमेश अय्यर म्हणाले, “पायल रोहतगी यांनी नेहरू-गांधी कुटुंबाबद्दल वारंवार अपमानास्पद टिप्पणी केल्या आहेत. अशीच एक अलीकडे केलेली पोस्ट आमच्या निदर्शनास आली आहे. त्यानंतर रमेश बागवे, मोहन जोशी, दत्ता बहिरत, संगीता तिवारी, मी आणि पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून सायबर क्राइम सेलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी औपचारिक तक्रार संगीत तिवारी यांनी दाखल केली होती. पोलिसांनी त्यावर कारवाई केली असून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

हेही वाचा: KBC 13: सात कोटी रुपयांच्या 'जॅकपॉट' प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का?

पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पायलविरोधात एफआयआर दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पायल रोहतगी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

loading image
go to top