गायिका कनिका कपूर एफआयआरने अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कनिकाला कार्यक्रमासाठी आगाऊ रक्कम देण्यात आली होती. मात्र कनिका कार्यक्रमाला आली नाही.

गायिका कनिका कपूर सध्या अडचणीत आली आहे. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने तिच्याविरुद्ध फसवणुक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. 

‘बेबी डॉल’ या गाण्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका कनिका कपूर वर कार्यक्रमासाठी उपस्थित न राहून पैसे परत न केल्याचा आरोप आहे. नोएडातील उद्योजक मनोज शर्मा यांनी 22 जानेवारीला अलीगढ येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी त्यांनी कनिका कपूरला परफॉर्मन्ससाठी आमंत्रित केले होते. यासाठी त्यांनी कनिकाला 24 लाख 95 हजार रुपयांची आगाऊ रक्कम देखील दिली होती. मात्र, कनिकाने या कार्यक्रमाला उपस्थित न राहता घेतलेले पैसे देखील परत करण्यास नकार दिला. त्यामुळे मनोज शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी कनिका कपूर, तिची मॅनेजर श्रुती आणि मुंबई स्थित कंपनीचे व्यवस्थापक संतोष मिजगेर यांच्याविरुद्ध (कलम 420) फसवणूक करणे, (कलम 406) विश्वासघात करणे आणि (कलम 507) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिका न आल्याने कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असून मनोज शर्मा हे मानहानीचा खटला दाखल करण्याच्या विचारात असल्याचेही सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR Against Singer Kanika Kapoor