Poonam Pandey: धक्कादायक! अभिनेत्रीच्या घराला लागली आग! रुम जळून खाक अन् कुत्रा.. व्हिडिओ व्हायरल

Poonam Pandey House Caught Fire
Poonam Pandey House Caught FireEsakal
Updated on

Poonam Pandey House Caught Fire: अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. मात्र नुकतीच तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. पूनमच्या फ्लॅटला आग लागली. या आगीत तिच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत तिची बेडरूम पूर्णपणे जळाली आहे.

आग लागली तेव्हा पूनम पांडे घरात नव्हती. तिच्या घरात काम करणारी महिला आणि कुत्रा हे यावेळी घरात होते. या आगीत कुत्रा अडकला होता मात्र त्याला वेळीच वाचवण्यात आले. मुंबईतील तिच्या अपार्टमेंटमध्ये ही आग लागली होती. पापाराझी पेजने या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.

Poonam Pandey House Caught Fire
Swara Bhasker trolled: स्वराला फोटोशूट जमलं मात्र भगव्या रंगानं सगळं बिघडलं! नेटकऱ्यांच्या कमेंटनं रंगली चर्चा

पूनम ही मुंबईतील एका इमारतीत 16व्या मजल्यावर राहते. ही घटना तेव्हा घडली जेव्हा पूनम घरी नसून तिचा पाळीव कुत्रा तिथे होता. मात्र यावेळी तिच्या हेल्परने पाळीव कुत्रा सीझरला वाचवले आणि आता तिचे मित्र त्याची काळजी घेत आहेत.

Poonam Pandey House Caught Fire
Dunki Release Date: जवान सुपरहिट होताच किंग खाननं सांगितली 'डंकी'ची रिलिज डेट! 'या' दिवशी शाहरुख करणार तिसरा धमाका

सोसायटीतील लोकांनी अग्निशमन विभागाला फोन केला. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. याघटनेचा व्हिडिओ पूनम पांडेने तिच्या सोशल मीडिया व्हिडिओ शेयर केला आहे.

सध्या पूनम तिच्या आगामी शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपुर्वी तिने मलायका अरोरा, सुनील ग्रोवर, सिद्धार्थ कन्नन आणि किकू शारदा यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते.

पूनम पांडे ही तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते. सध्या ती अनेक म्युझिक अल्बम प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. पूनम शेवटची 'लॉकअप'मध्ये दिसली होती. या शोने तिला खूप प्रसिद्धी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com