'यु टर्न' या वेबसिरीजचा पहिला भाग प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

- काल (ता.23) 'यु टर्न' ही वेबसिरीजचा पहिला भाग प्रदर्शित झाला.

- वेबसिरीजमध्ये सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदे हे प्रमुख भुमिकेत आहेत.

काल (ता.23)  'यु टर्न'  ह्या वेबसिरीजचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या वेबसिरीजमध्ये सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदे हे प्रमुख भुमिकेत असून, नवारा बायकोच्या व्यक्तिरेखा साकारत आहेत.

सायली संजीव ही मुक्ता तर ओमप्रकाश हा ओदित्य नावाचे पात्र करत आहे. मुक्ता आणि आदित्य हे जोडप घटस्फोटच्या मार्गावर असून, या सगळ्या गोंधळात त्या दोघांच प्रेम काय वळण घेतय याची कहाणी म्हणजे यु टर्न. घटसफोटाच्या जवळ असताना सासरच्यांशी असलेल नात, आणि त्यात अजाणपणे निर्माण होणारी अस्वस्थता, हे सगळं आपल्याला पहिल्या भागात बघायला मिळत. पहिल्या भागाने या  वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढवली आहे. 

नवरा बायको म्हंटल की वाद, भांडण, रूसवे फुगवे आलेच. अशाच एका नवरा बायकोचा प्रवास आपल्याला यु टर्न या वेबसिरीजमध्ये अनुभवायला मिलणार आहे. आजच्या काळात घटस्फोटाच्या पिंजर्यात अडकलेल्या जोडप्यांनी एक यु टर्न संधी घ्यावी? का असा प्रश्न या वेबसिरीजमुळे नक्कीच पडणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First episode of u turn webseries released