हॉलिवूडची गोड अभिनेत्री करणार प्रिन्सेस डायनाचा रोल

वृत्तसंस्था
Sunday, 31 January 2021

बायोपिकच्या या जमान्यात आता डायनाचाही बायोपिक येणार आहे हे निश्चित झालंय. ‘स्पेन्सर’ असं या सिनेमाचं नाव आहे. यात डायनाचा रोल कोण करणार याचीही उत्सुकता लागली होती.

प्रिन्सेस डायनाच्या सौंदर्यानं सगळ्या जगाला भूरळ घातली होती. राजघराण्यातल्या या वादग्रस्त व्यक्तिमत्वाचा शेवट अतिशय धक्कादायक झाला. पॅरिसमध्ये एका कार अपघातात डायनाला जीव गमवावा लागला. कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या डायनाचं चरित्र अजून पडद्यावर कसं आलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण, बायोपिकच्या या जमान्यात आता डायनाचाही बायोपिक येणार आहे हे निश्चित झालंय. ‘स्पेन्सर’ असं या सिनेमाचं नाव आहे. यात डायनाचा रोल कोण करणार याचीही उत्सुकता लागली होती. पण, तिच्या रोलसाठीचं नाव फायनल झालंय अवढच नव्हे तर, तिचा फर्स्ट लूकही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

फर्स्ट लूक रिलीज 
‘स्पेन्सर’चं कथानक प्रिन्सेस डायनाच्या आयुष्यावर लिहीले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पाब्लो लॅरेन यांनी केले आहे. सिनेमाचा स्क्रीन प्ले कसा असेल, यावर त्या सिनेमाचं यश अवलंबून असणार आहे.  स्टीवेन नाइट यांनी स्क्रीप्ट अर्थात स्क्रीन प्ले लिहिला आहे.  स्टीवेन नाइट यांनी पिकी ब्लाइंडर या प्रसिध्द टीव्ही शोचं लेखन केलं होतं. सिनेमाच्या फर्स्ट लूकमुळं त्याची उत्सुकता वाढलीय. 

'हॉट' राहणं आणि ठेवणं हीच सनीची खरी ओळख

क्रिस्टिन करणार लीड रोल
प्रिन्सेस डायनाच्या भूमिकेत हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टिन स्टुअर्ट दिसणार आहे. क्रिस्टिन ही पण तिच्या दुधाळ सौंदर्यासाठी ओळखली जाते. ट्वायलाईट सीरिजमधून क्रिस्टिन सर्वाधिक चर्चेत आली. इंटू द विंड, अंडरवॉटर हे तिचे आधीचे सिनेमा गाजले होते. डायनाच्या लूकमधील फोटो क्रिस्टिननं स्वतः सोशल मीडियावर शेअर केलाय. 

जॉनीनं 20 वर्षे छोट्या किराला किस केलं; पायरेट्स ऑफ कॅरिबियनची वेगळी गोष्ट

‘स्पेन्सर’हेच टायटल का?
चित्रपटचं ‘स्पेन्सर’हे टायटल प्रिन्सेस डायनाच्या पहिल्या नावावरून ठेवले आहे. डायना ही उस्फूर्त बोलणारी आणि बिनधास्त आयुष्य जगणारी होती.  डायनाचे लग्न प्रिन्स चार्ल्सशी लग्न झालं. लग्नानंतर प्रिन्स चार्ल्स आणि डायनाचे यांचे वैवाहिक आयुष्य हे एका परिकथेप्रमाणे सुरू होते. पण, विवाह बाह्यसंबंधांमुळे त्यांचा डिवोर्स झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Look Kristen Stewart as Princess Diana in Spencer