First Look : 'इम्तियाज' स्टाईल 'लव्ह आज कल'चं पोस्टर बघाच!

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सैफ अली खान आणि दीपिका पदुकोनचा पहिला 'लव्ह आज कल' आजही प्रेक्षकांचा आवडता आहे. त्यात इम्तियाज अली पुन्हा एकदा एक रेट्रो आणि सद्यस्थितीवर भाष्य करणारी लव्हस्टोरी घेऊन येत असल्याने त्याचे चाहते खूश आहेत.

दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' 14 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येतोय. आज या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालंय. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. सैफ अली खान आणि दीपिका पदुकोनचा पहिला 'लव्ह आज कल' आजही प्रेक्षकांचा आवडता आहे. त्यात इम्तियाज अली पुन्हा एकदा एक रेट्रो आणि सद्यस्थितीवर भाष्य करणारी लव्हस्टोरी घेऊन येत असल्याने त्याचे चाहते खूश आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभिनेता कार्तिक आर्यन याने हे पोस्टर शेअर केलंय. या पोस्टरमध्ये कार्तिक आणि सारा दिसताहेत. कार्तिक झोपलाय आणि त्याच्या पाठीवर सारा पहुडली आहे, असं हे पोस्टर आहे. पोस्टरवर 'LOVE AAJ KAL' असं लिहिलंय आणि दोन्ही बाजूला #2020 आणि #1990 अशी वर्षं लिहिली आहेत. या पोस्टरला कार्तिकने 'वहाँ हैं नहीं जहाँ लेटे हैं... कहीं उड़ रहे हैं Veer और Zoe' असं कॅप्शन दिलंय. तर उद्या या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित होईल असंही सांगितलंय. पोस्टरवरून तरी इम्तियाज स्टाईल लव्हस्टोरी पुन्हा बघायला मिळणार हे निश्चित!

या अभिनेत्रीने चक्क उसाच्या शेतात केले हे काम, अन् लोक म्हणाले...

पहिल्या 'लव्ह आज कल'मध्ये सैफ अली खान, दीपिका पदुकोन, ऋषी कपूर, जिसली मॉन्टेरिओ हे मुख्य भूमिकेत दिसले होते. आजच्या काळातली आणि जुन्हा काळातल्या नाजूक प्रेमकहाणीचं दर्शन इम्तियाजने यात घडवलं होते. या चित्रपटाचे संगीतकार प्रीतम आहेत. 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला हा चित्रपट प्रदर्शित होईल. पोस्टरवरून तरी इम्तियाज स्टाईल लव्हस्टोरी पुन्हा बघायला मिळणार हे निश्चित!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first look of Love Aaj Kal released directed by Imtiaz Ali