'सेक्शन 375' चा पहिला टीझर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

- सेक्शन 375 या आगामी चित्रपटाचा पहिला टीझर आज रिलीज करण्यात आला आहे.

- अजय बाहल दिगदर्शित या सिनेमा मध्ये रिचा चड्ढा आणि अक्षय खन्ना मुख्य भुमिकेत आहेत. 

सेक्शन 375 या आगामी चित्रपटाचा पहिला टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 13 सप्टेंबर ला प्रदर्शित होणार आहे. अजय बाहल दिगदर्शित या सिनेमा मध्ये रिचा चड्ढा आणि अक्षय खन्ना मुख्य भुमिकेत आहेत. 

सेक्शन 375 हा चित्रपट एक कोर्टरूम ड्रामा आहे. हा चित्रपट भारतीय दंड संहितेतील कलम 375 वर भाष्य करतो, जो की बलात्काराचा गुन्हा दर्शवतो. टीझरमध्ये आपल्याला रिचा चड्ढा आणि अक्षय खन्ना हे वकिलाच्या वेशात दिसतात. तर टीझर भारतातील बलात्कार प्रकरणातील तथ्य आणि आकडेवारी यांची बरोबरी बाकी देशांशी आपल्याला करून दाखवतो. 

या चित्रपटात रिचा चड्ढा सरकारी वकील हिरल मेहता हे पात्र करत आहे. तर अक्षय खन्ना गुन्हेगार वकील तरुण सलूजा हे पात्र साकारत आहे. या सिनेमामध्ये मीरा चोप्रा झाकीर हुसेन, कुमुद मिश्रा, कुलभूषण खरबंदा आणि अतुल कुलकर्णी हे कलाकार आपल्याला दिसणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first teaser of film section 375 released