लंडनमध्ये रेकाॅर्डिंग झालेल्या पहिल्या गाण्याला झाली चाळीस वर्षे पुर्ण; वाचा माहिती

लंडनमध्ये रेकाॅर्डिंग झालेल्या पहिल्या गाण्याला झाली चाळीस वर्षे पुर्ण; वाचा माहिती

मुंबई ः आज हिंदी चित्रपटांचे परदेशात अनेक ठिकाणी चित्रीकरण होत असले आणि अनेक गाण्यांचे रेकाॅर्डिंग परदेशात केले जात असले तरी पहिल्यांदाच परदेशात रेकाॅर्डिंग झालेले गाणे म्हणजे 'आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये'. फिरोज खान यांच्या कुर्बानी चित्रपटातील हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले आणि कुर्बानी हा चित्रपट सुपरहिट ठरला. हे गाणे लिहिले होते
इंदीवर यांनी. ते पाकिस्तानी गायिका नाझिया हसन यांनी गायले होते आणि त्याला संगीत दिले होते बिद्दू यांनी. आज हे गाणे आणि या चित्रपटाला तब्बल चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. २० जून १९८० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अॅक्शन आणि रोमान्स यांनी भरलेला होता.  

फिरोज खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टायलिश अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांची आणि विनोद खन्ना यांची जीवलग मैत्री होती. त्यांच्या मैत्रीचे किस्से अनेक आहेत आणि त्यांनी एकत्रित अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोन्ही दिग्गज कलाकारांचे निधनही एकाच तारखेला झाले. फिरोज खान यांनी २७ एप्रिल २००७ मध्ये या जगाचा निरोप घेतला तर
विनोद खन्ना यांनी २७ एप्रिल २०१७ मध्ये हे जग सोडले. कुर्बांनी या चित्रपटात त्यांच्या दोघांव्यतिरिक्त झीनत अमान, अमजद खान, शक्ती कपूर, कादर खान, अमरिश पुरी आदी कलाकार होते. इटालियन चित्रपट द मास्टर टच या चित्रपटाचा हा रिमेक होता. यातील अन्य गाण्यांना संगीत कल्याणजी-आनंदजी यांनी दिले होते. मात्र आप जैसा कोई...हे एकमेव गाणे लंडन येथील एका स्टुडिओत रेकाॅर्ड करण्यात आले. मात्र त्या गाण्याचे चित्रीकरण मुंबईत झाले. बिना का गीतमालामध्ये तेव्हा हे गाणे पहिल्या क्रमांकावर होते. पाश्चिमत्य संस्कृतीचे अधिक चित्रपट या चित्रपटात होते. एक स्टाईलबाज आणि हटके असाच हा चित्रपट फिरोज खान यांनी एफ. के. इंटरनॅशनल या बॅनरखाली बनविला होता. आज जरी कित्येक गाण्यांचे रेकाॅर्डिंग परदेशात होत असले तरी फिरोज खान यांनी हे आगळेवेगळे आणि स्टायलिश गीत आपल्या चित्रपटात फिट बसविले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com