'फ्रेंड्स रियुनियन'नंतर 'चँडलर'चं ब्रेकअप; २२ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी तुटलं नातं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Matthew Perry and Molly Hurwitz

'फ्रेंड्स रियुनियन'नंतर 'चँडलर'चं ब्रेकअप; २२ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी तुटलं नातं

एकीकडे जगभरात 'फ्रेंड्स रियुनियन' Friends Reunion या अमेरिकन सिटकॉमची उत्सुकता होती, तर दुसरीकडे याच मालिकेत 'चँडलर'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मॅथ्यू पेरीचं Matthew Perry गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअपचं वृत्त चर्चेत आलं. मॅथ्यूने त्याच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या मॉली हर्टविझशी Molly Hurwitz साखरपुडा मोडला. 'कधी कधी काही गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत', असं म्हणत त्याने गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. 'फ्रेंड्स रियुनियन' हा विशेष भाग जगभरात प्रसारित झाल्यानंतर हे वृत्त समोर आलं. या मालिकेत मॅथ्यूने चँडलर बिंगची भूमिका साकारली होती. (Friends Matthew Perry calls off engagement with fiancee Molly Hurwitz)

मॅथ्यू ५१ वर्षांचा असून मॉली ही २९ वर्षांची आहे. २०१८ मध्ये या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर २०२० मध्ये मॅथ्यू आणि मॉलीने साखरपुडा केला. ब्रेकअपविषयी 'पीपल'ला दिलेल्या मुलाखतीत मॅथ्यू म्हणाला, "कधी कधी काही गोष्टी नाही पूर्ण होऊ शकत आणि त्यापैकीच हे एक आहे. मॉलीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा." पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मॉलीच्या आधी मॅथ्यू हा लिजी केप्लॅनसोबत सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. २०१२ मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

'फ्रेंड्स'शिवाय मॅथ्यूने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'फुल्स रश', 'ऑलमोस्ट हिरोज', 'द होल नाइन यार्ड्स', '१७ अगेन' या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. 'फ्रेंड्स रियुनियन' भागात मॅथ्यू हा जेनिफर अॅनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, डेव्हिड श्विमर आणि मॅट लेब्लँकसोबत झळकला होता. १७ वर्षांनंतर हे सर्व कलाकार पुन्हा एकदा एकाच मंचावर एकत्र आले होते.

टॅग्स :Entertainment