Friendship day: लक्ष्या आणि निवेदिता सराफ यांच्या मैत्रीतील 'सुरमई' प्रकरण काय आहे?

अशोक मामाच नाही तर निवेदिता सराफ यांचेही होते लक्ष्याशी होते खास नाते, हा किस्सा बघाच..
friendship day 2023 : nivedita saraf and lakshmikant berde friendship nivedita cooked surmai fish for lakshya
friendship day 2023 : nivedita saraf and lakshmikant berde friendship nivedita cooked surmai fish for lakshya sakal

friendship day : मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवणारे अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मित्रांनी ''दोस्ती तुटायची नाही'' म्हणत अनेक चित्रपट गाजवले. पुढे हि मैत्री इतकी घट्ट झाली कि प्रत्येक चित्रपट त्यांचाच असावा असे चाहत्यांना वाटत होते. त्यातही लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची मैत्री विशेष जिव्हाळ्याची. पण केवळ यांचीच मैत्री जिव्हाळ्याची नव्हती त्यापेक्षा घट्ट नाते होते ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता सराफ यांचे. (friendship day 2023 : nivedita saraf and lakshmikant berde friendship nivedita cooked surmai fish for lakshya)

लक्ष्या आणि निवेदिता सराफ हे बालपणापासूनचे मित्र. त्यांच्यातील मैत्री इतकी घट्ट होती कि एकमेकांना काय आवडतं, काय नाही, स्वभाव, वागणं सगळंच ठाऊक होतं. दुर्दैवाने लक्ष्याचे लवकर निधन झाल्याने हि मैत्री अर्ध्यात थांबली पण बंध अजूनही तसेच आहेत. या दोघांच्या मैत्रीला जोडणारी एक गोष्ट फार महत्वाची होती ती म्हणजे 'सुरमई'. आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. निवेदिता ताईंच्या हातची 'खोबऱ्यातली सुरमई' हि लक्ष्याची आवडती डिश. लक्ष्या घरी आला कि सुरमईचा बेत होणारच.

याविषयी एकदा निवेदिता ताई म्हणाल्या होत्या, 'लक्ष्मीकांत आणि मी अनेक नाटकांतून, चित्रपटातून एकत्रित काम केले आहे. आम्ही बालपणापासूनचे मित्र. त्यामुळे सुरुवातीपासूनच आमच्यात खूप चांगलं बॉंडिंग होते. पुढे माझं आणि अशोकचं लग्न झाल्यावर आम्ही १० वर्षे एकमेकांचे शेजारी होतो. त्यामुळे आमच्या मैत्रीतील नाते खूप वेगळे होते. त्याला खोबऱ्यातली सुरमई प्रचंड आवडायची. म्हणजे माझ्या हातची सुरमई तो सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कोणत्याही वेळी खायला तयार असायचा. आजही सुरमई करताना मला त्याची आठवण येतेच.'अशी खास आठवण निवेदिता सराफ यांनी संगीतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com