'फू बाई फू' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार सूत्रसंचालन.. Vaidehi Parshurami | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fu Bai Fu, Zee Marathi Comedy Show, coming soon...

'फू बाई फू' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार सूत्रसंचालन..

Fu Bai Fu: झी मराठी नेहमीच प्रेक्षकांच मनोरंजन वेगवेगळे कार्यक्रम सादर करून करत आली आहे. फू बाई फू या कार्यक्रमाचे तब्बल १४ भाग प्रदर्शित झाले होते. आता ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा झी मराठी घेऊन येत आहे कॉमेडीचा एक नवीन तडका फु बाई फु हा कार्यक्रम. या कार्यक्रमात कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: एका बॅगेसाठी सदस्य उठले एकमेकांच्या जीवावर, हाणामारीनं रंगला दिवस

तसेच काही नवे कलाकार देखील या कार्यक्रमात असणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार असून परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत करणार आहेत. या कार्यक्रमात हास्याची धमाल उडवून देणारे कलाकार कोण असणार आहेत याचीच चर्चा होताना सध्या दिसत आहे.

हेही वाचा: Ranveer Singh: मंचावर लहान मुलाप्रमाणे धावत सुटला रणवीर, नानांचे धरले पाय अन् गालावर केलं किस

आता फू बाई फू परत येणार म्हणजे मराठी प्रेक्षक पोट धरुन हसणार यात शंकाच नाही. या कार्यक्रमानं महाराष्ट्राला अनेक हरहुन्नरी कलाकारांची ओळख करुन दिली. अनेक कलाकारांना मनोरंजनसृष्टीचं प्रवेशद्वार खुलं करुन दिलं. आज इंडस्ट्रीत अनेक दिग्ग्ज कलाकार आहेत ज्यापैकी काही जणांना फू बाई फू च्या मंचानेच पहिली संधी दिली होती.

या स्टॅंड अप कॉमेडी शो मध्ये अनेक विषय हाताळले जायचे. समाजातील अनेक गंभीर गोष्टींना विनोदाची किनार देत लोकांपर्यंत सहज पोहोचवण्याचा उद्देश त्यामागे असायचा. अनेक कलाकारांसोबत अनेक लेखकांनाही या मंचानं पुढे येण्याची संधी दिली. असा सर्वांचा लाडका विनोदी कार्यक्राम परत येतोय म्हणजे प्रत्येकजण सुखावला असणारच. पण आता चर्चा अधिक रंगलीय ती म्हणजे कार्यक्रमात कोणते कलाकार विनोदाची बॅटिंग करताना दिसणार याची. ते देखील लवकर कळेलच.

हेही वाचा: Tarak Mehta: 'तारक मेहता' फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर, दयाबेनच्या आवाजानं केला घात

तुम्ही हसणार पोट धरून... कारण इथे कॉमेडी होणार भरभरून. पाहायला विसरू नका "फु बाई फू" ३ नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९:३० वा. फक्त झी मराठीवर.