Fukrey 3 Twitter Review: 'चुचा'ची जादुई शक्ती करणार का काम? फुक्रे पाहून काय म्हणाली लोकं?

Fukrey 3 Trailer
Fukrey 3 Traileresakal

Fukrey 3 Twitter Review: गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात एका चित्रपटाची खुप चर्चा रंगली होती तो म्हणजे 'फुक्रे 3'. आज म्हणजेच 28 सप्टेंबरला फुक्रे 3 रिलीज झाला आहे.

'फुक्रे' आणि 'फुक्रे रिटर्न्स'मध्ये कॉमेडीनं दहशत निर्माण करणारी कलाकारांची टोळी परत आली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन होईल अशी आशा अनेकांना होती. त्यातच आता चुचाचा नवीन चमत्कार आणि भोली पंजाबनचे नवे कारस्थान आणि चित्रपटाची कथा याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खुपच उत्सुक होते.

आज हा चित्रपट रिलिज झाला असून अनेकांनी या चित्रपटाला पहिल्याच दिवशी पाहिला. आता प्रेक्षकांना हा सिनेमा कसा वाटला याबद्दल चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटवर शेयर केला आहे. ट्विटरवर, चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्यानं ट्विटवर 'फुक्रे 3' चा ट्रेडिंगला आला आहे.

Fukrey 3 Trailer
Ranbir Kapoor Birthday: "तुझं सिक्रेट सोशल मिडीया अकाऊंट..", हटक्या अंदाजात आलियानं दिल्या रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ट्विट आणि चित्रपटाचा रिव्ह्यू पाहता फुक्रे 3 ला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काहींना रिचा चढ्ढाचा अभिनय आवडला तर काहींना चुचाचा चमत्कार. मात्र यावेळी चित्रपटात पंकज त्रिपाठीने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे.

एकाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'पंकज त्रिपाठीने चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. नेहमीप्रमाणेच त्याने मने जिंकली आहेत.

Fukrey 3 Trailer
CM Eknath Shinde: "मुख्यमंत्र्यांच्या पत्नी माझ्या मोठ्या फॅन", वर्षा बंगल्यावर गेलेल्या सुकन्या मोनेंचा विलक्षण अनुभव

ट्विट रिव्ह्यू

तर दुसऱ्याने लिहिलंय की, जवान नंतर पाहण्यासारखा कोणता चित्रपट असेल तर तो हाच आहे, चित्रपट चांगला आहे. नक्कीच बघा.

तर आणखी एकाने लिहिलंय की. Fukrey 3 मजेदार आहे. हा भाग चित्रपटाच्या फ्रँचायझीला नक्कीच न्याय देतो. चांगली पटकथा, काही विचित्रपणा, वन लाइनर.. सर्व कलाकार कॉमिक टायमिंग कमाल.. हा चित्रपट तुमचे मनापासून मनोरंजन करेल.

वाईल्ड राइडसाठी सज्ज व्हा हे.. विक्षिप्त..मजेदार क्षणांसह एक जोरदार संदेश देखील आहे...असं एकानं लिहिले आहे.

असे अनेक रिव्ह्यू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेयर करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही आहेत.

Fukrey 3 Trailer
Mahesh Bhatt : 'जो देश महिलांच्याबाबत...' महिला आरक्षण विधेयकावर महेश भट्ट यांची रोखठोक प्रतिक्रिया

चित्रपटाची कथा:

फुक्रे 3' मध्ये जुनीच स्टोरी पुढे नेण्यात आली आहे. यात आफ्रिकेतील कोळशाच्या खाणीपासून ते दिल्लीतील मनोरंजन पार्कपर्यंत पसरलेल्या एका भन्नाट प्रवासाचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

या चित्रपटात हन्नी (पुलकित सम्राट), चुचा (वरुण शर्मा), पंडित जी (पंकज त्रिपाठी) आणि लाली (मनजोत सिंग) यांच्या भूमिका आहेत. तो एका 'देजा-चू' क्षणाने प्रेरित होऊन समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने भोली पंजाबन (रिचा चढ्ढा) विरुद्ध निवडणूक लढवतो. आणि पुढे जे काही होते हे पाहिल्यानंतर प्रेक्षक आपलं हसू आवरु शकत नाहीत.

Fukrey 3 Trailer
Navya Naveli Nanda : सिद्धांतसोबत नाव घेतलं जात असतानाच अमिताभ यांच्या नातीनं दिली मोठी प्रतिक्रिया, 'लग्न झाल्यावर...'

चित्रपटातील कलाकार

'फुक्रे 3' मध्ये पुलकित सम्राट, रिचा, वरुण शर्मा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी देखील आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केले आहे, तर चित्रपटाची कथा विपुल विग यांनी लिहिली आहे. 'फुक्रे ३' ची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com