Mahesh Bhatt : 'जो देश महिलांच्याबाबत...' महिला आरक्षण विधेयकावर महेश भट्ट यांची रोखठोक प्रतिक्रिया

देशभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिला आरक्षण विधेयकाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.
Mahesh Bhatt Reaction
Mahesh Bhatt Reaction

Women Reservation Bill: देशभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिला आरक्षण विधेयकाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यावर साधक-बाधक चर्चाही होत आहे. कित्येकांनी या विधेयकावर दिलेल्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. अशातच बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी दिग्दर्शक महेश भट्ट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

आपल्या परखड आणि रोखठोक भूमिकेसाठी महेश भट्ट हे ओळखले जातात. बिग बॉस ओटीटी च्या सीझनमध्ये महेश भट्ट आल्यानंतर वेगळ्याच वादाला सुरुवात झाली होती. त्यावरुन सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रतिक्रिया देखील चर्चेत होत्या. भट्ट हे गेल्या तीन दशकांहून अधिक बॉलीवूडमध्ये सक्रिय असणारे दिग्दर्शक आहे. त्यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त झाला आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

Mahesh Bhatt Reaction
The Vaccine War Twitter Review : आपण आपल्या 'रियल हिरों'चे कौतुक कधी करणार अग्निहोत्रींनी दिला मोठा दणका!

संसदेच्या दोन्ही सदनामध्ये महिला आऱक्षण विधेयक संमत झाले. त्यावरुन आलेल्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. फिल्म इंडस्ट्रीमधून अनेकांनी त्यावर आपले विचार व्यक्त केले आहे. महेश भट्ट यांनी म्हटले आहे की, जो देश हा आपल्या देशातील महिलांचा सन्मान करत नाही त्या देशातील समाजाची बाहेर ओळख सभ्य म्हणून राहत नाही.

Mahesh Bhatt Reaction
Shah Rukh Khan : 'विराट कोहली जावई आहे आपला'! किंग खान असं का म्हणाला?

एएनआयसोबत बातचीत करताना महेश भट्ट म्हणाले की, मला खूप आनंद झाला आहे की, महिला आरक्षणाबाबत जो निर्णय घेण्यात आला आहे त्याला अनेकांचा पाठींबा आहे. महिला आरक्षण बिलाविषयी सांगायचे झाल्यास तो कौतुकास्पद निर्णय आहे. मी अशा एकत्र कुटूंबात वाढलेलो आहे. आम्ही बहिण भावंड मोठ्या आनंदानं राहत होतो. महिला शक्ती काय आहे, त्याचा प्रभाव काय असतो हे मला माहिती आहे. आम्हा भावंडांमधील नाते कायम आहे.

Mahesh Bhatt Reaction
Nana Patekar : 'आजकालचे अभिनेते हे...' नाना पाटेकर पुन्हा बोलले! जुन्या काळातील दिग्गजांच्या आठवणींना दिला उजाळा

मला आनंद आहे की आपण मोठ्या दिशेच्या वाटेनं निघालो आहोत. त्या निर्णयाचे कौतुक करायला हवे. भविष्यात आपल्याला त्याचे फायदे दिसून येतील. याची खात्री आहे. आपण सर्वांनी त्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com