'बिग बॉस' फेम अभिजित बिचकुले आहे कोण?

टीम ई-सकाळ
Friday, 21 June 2019

खासदार उदयनराजेंविरोधात दाखल केली होती याचिका

पुणे : 'बिग बॉस' मराठी सीझन-2 या कार्यक्रमातील साताऱ्यातील स्पर्धक अभिजित बिचुकले यांना पोलिसांनी आज (शुक्रवारी) अटक केली. चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले यांना ही अटक करण्यात आली आहे. 

अभिजित बिचकुले यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी राजकारणातही आपले नशीब आजमावले. इतकेच नाहीतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही त्यांनी नशिब आजमावले होते. 

अभिजित बिचकुले आहेत तरी कोण?

सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून त्यांनी सुरवातीला काम केले. त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, एकही निवडणूक त्यांना जिंकता आली नाही. तरीदेखील पुढचा मुख्यमंत्री मीच ठरविणार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 48 जागा तर विधानसभेच्या 288 जागा लढवणार असल्याचे बॅनर साताऱ्यात लावण्यात आले होते.

राष्ट्रपतिपदासाठीही केली होती विनंती

नगरसेवक ते खासदार पदासाठी बिचुकले यांनी निवडणूक लढवली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतिपदासाठी पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी 'भारताचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही माझेच नाव घोषित करावे,' अशी विनंतीही केली होती.

खासदार उदयनराजेंविरोधात दाखल केली होती याचिका

2009 मध्ये उदयनराजे भोसले पहिल्यांदाच खासदार झाले. तेव्हा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या उदयनराजे यांच्याविरोधात अभिजित बिचुकलेंनी एक याचिका दाखल केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Full Profile of Big Boss Fame Abhijit Bichakule